Marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Major update for NPS employee ] : राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे . यामध्ये काही प्रकरणी राष्ट्रीय पेन्शन योजना धारकांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ लागू करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत .
केंद्र सरकारच्या अधिनस्त राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS) अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना नुकतेच युनिफाईड पेन्शन स्कीम ही पर्यायी पेन्शन योजना निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .
सदर युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये देखिल जुनी पेन्शन योजना प्रमाणे लाभ मिळत नसल्याचे , निदर्शनास आल्याने कर्मचाऱ्यांकडून पुन्हा जुनी पेन्शन योजनाची ( Old pension scheme) मागणी केली जात आहे . तर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी खालील प्रकरणी जुनी पेन्शन योजनाचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या प्रकरणी मिळणार जुनी पेन्शन योजनेचा लाभ : राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास , अशा कर्मचाऱ्यांच्या परिवारास जुनी पेन्शन योजना ( old pension scheme) प्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार आहे .
याकरिता सदर कर्मचाऱ्यांनी सेवा कालावधीत Form 01 भरणे आवश्यक असेल , जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना जुनी पेन्शन योजना प्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळेल .