Marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ non teaching staff post eligibility criteria adhisuchana ] : शिक्षकेतर कर्मचारी पदासाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे .
यामध्ये कनिष्ठ लिपिक , वरिष्ठ लिपिक , प्रमुख लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल , शिपाई या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे .पदानुसार शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे पाहू शकता..
कनिष्ठ लिपिक : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समक्ष शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . त्याचबरोबर मराठी 30 श. प्र.मी टायपिंग व इंग्रजी 40 श. प्र. मि. टायपिंग पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वरिष्ठ लिपिक : कनिष्ठ लिपिक पदावरून नियमित वेतनश्रेणीसह किमान तीन वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्यांना वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नतीसाठी सदर पद राखीव ठेवण्यात आले आहेत .
प्रमुख लिपिक : वरिष्ठ लिपिक पद धारण करून नियमित वेतनश्रेणीसह किमान तीन वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्यांना प्रमुख लिपिक पदावर पदोन्नतीने सदर पद राखीव ठेवण्यात आले आहेत .
ग्रंथपाल : बी.lib, ग्रंथालय विज्ञान विषयाच्या पदविकेसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
प्रयोगशाळा सहाय्यक : बारावी उत्तीर्ण ( विज्ञान शाखा )
शिपाई : बारावी उत्तीर्ण ( सदर पद केवळ अनुकंप तत्वासाठी भरले जातील )

- राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी ; अर्थसंकल्पात विशेष तरतूद !
- शिक्षकेतर कर्मचारी पदासाठी शैक्षणिक पात्रता निश्चित ; अधिसूचना निर्गमित !
- राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !