PMMY : रुपये 50 हजार पासून ते 10 लाख रुपये , पर्यंत कर्ज मिळवा अगदी सहजरित्या ! कर्जासाठी कोणत्याही जमिनीची आवश्यकता भासणार नाही !

Spread the love

देशभरातील प्रत्येक नागरिकांना स्वतःचे काम मिळावे यासाठी केंद्र सरकार नाविन्यपूर्ण योजना राबवत आहे. देशकात रोजगाराची निर्मिती व्हावी आणि नागरिकांची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी यासाठी शासन नक्कीच नागरिकांना हातभार लावत आहे. ज्या नागरिकांना नोकरी किंवा इतर कोणत्याही काम मिळत नाही त्या नागरिकांनी या योजनांचा लाभ घेऊन आपल्या स्वतःचा रोजगार स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. आपली आर्थिक बाजू बळकट करू शकता. यासाठीच केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे त्या योजनेचे नाव आहे पंतप्रधान मुद्रा योजना.

पीएम मुद्रा योजनेच्या माध्यमातून अगदी गोरगरीब नागरिकांपासून मोठ्या उद्योगपती पर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते. पंतप्रधान मुद्रा योजना मध्ये विशेष म्हणजे तीन विभागण्या केल्या आहेत. त्यामध्ये पहिला भाग आहे पीएम मुद्रा शिशु योजना. त्यानंतर दुसरा भाग येतो पीएम मुद्रा किशोर योजना. त्यानंतर पुढे तिसरा भाग येतो पीएम मुद्रा तरुण योजना. 8 एप्रिल 2015 रोजी ही योजना प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात आली आहे. खास करून ही योजना बिगर कॉर्पोरेट क्षेत्रातील नागरिकांकरिता जे लघु उद्योजक असतील यासोबतच उद्योग निर्मिती करू इच्छिणारे असतील त्यांना दहा लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही 50 हजार रुपयांपासून दहा लाख रुपयांचे कर्ज अगदी स्वस्त व्याज दरात मिळू शकतात.

वेबसाईटच्या माध्यमातून या योजनेबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही शासनाच्या www.mudra.org.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या कोणत्याही बँकेच्या माध्यमातून या योजनेविषयी माहिती मिळू शकतात. पीएम मुद्रा शिक्षण योजनेचा माध्यमातून तुम्हाला 50 हजार रुपये पर्यंत कर्ज प्राप्त होते. पीएम मुद्रा किशोर योजनेच्या माध्यमातून मला पन्नास हजार रुपयांपासून पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज प्राप्त होते. त्यानंतर थोडे येथे पीएम मुद्रात तरुण योजना या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पाच लाख पासून दहा लाख रुपये पर्यंत कर्ज प्राप्त होते…

तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्कीच तुम्ही या योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेऊन आपले भांडवल तयार करू शकता. ही योजना खास उद्योजकांसाठी च निर्माण केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जर समजा एखाद्या व्यक्तीला आपली छोटीशी दुकान उघडायचे असेल किंवा कोणताही प्रक्रिया उद्योग करायचा असेल किंवा इतर कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल परंतु तुमच्याकडे हवे तितके भांडवल उपलब्ध नसेल तर तुम्ही नक्कीच या योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेऊ शकता.

या योजनेची विशेष बाब सांगायची झाली तर कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी कोणत्याही जमिनीची आवश्यकता भासत नाही. यासोबतच कोणतेही शुल्क या ठिकाणी कर्ज घेत असताना भरावे लागत नाही. या योजनेच्या माध्यमातून वार्षिक व्याजदर हा 9% पासून 12% पर्यंत आकारला जातो. विविध बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत असताना यामध्ये थोडाफार फरक दिसेलच तरीही तुम्हाला या योजनेबाबत अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही वरील शासनाच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन माहिती घ्या…

Leave a Comment