@marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Revised criteria for determining difficult areas for intra-district transfers ] : जिल्हा अंतर्गत बदली करिता अवघड क्षेत्र निश्चित करणे संदर्भात सुधारित निकष जारी करण्यात आले आहे . या संदर्भात जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्यामार्फत दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सुधारित परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे .
सदर परिपत्रके ग्रामविकास विभागाच्या दिनांक 05.03.2025 रोजीच्या संदर्भातील पत्रानुसार निर्गमित करण्यात आले आहे . सदर परिपत्रकानुसार सद्यस्थितीत अवघड क्षेत्राची सुधारित यादी प्रसिद्ध करणे प्रस्तावित असून , अवघड क्षेत्रांचे निकष जारी करण्यात आलेले आहे . अवघड क्षेत्राचे निकष खालील प्रमाणे सुधारित करण्यात आले आहे .
01. पेसा / नक्षलग्रस्त गाव क्षेत्रात असणारे गाव . 02. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 2000 मिलिमीटर पेक्षा अधिक किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे गाव ( महसूल विभागातील संदर्भातील माहितीनुसार )
03. हिंस्र वन्य प्राणी यांच्यामुळे उपद्रव असणारे जंगल व्यक्त प्रदेश ( वनसंरक्षक यांच्या अहवालानुसार ) 04. वाहतुक सुविधांचा अभाव असणारे गाव त्याचबरोबर वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव यामध्ये रस्त्याने न जोडलेल्या शाळा .
05. नेटवर्क नसणारे संवाद छायेचा प्रदेश असणारे गाव 06. डोंगरी भाग प्रदेश ( नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार) 07. राष्ट्रीय राज्य महामार्गापासून दहा किलोमीटर पेक्षा जास्त दूर असणारे गाव .
वरील नमूद सात निकषांपैकी किमान तीन निकष पूर्ण करणारे गाव / शाळा हे अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे .
