दि.30 मार्च ते 04 एप्रिल पर्यंत राज्यातील या भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता ..

Spread the love

Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Thunderstorms are likely in these parts of the state from March 30 to April 4. ] : दिनांक 30 मार्च ते दिनांक 04 एप्रिल 2026 या कालावधीत राज्यातील काही भागामध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेला आहे .

राज्यात दिनांक 30 मार्च पासुन ढगाळ वातावरणाची शक्यता आहे , तर या दिवशी राज्यातील मराठवाडा , खानदेश , पश्चिम विदर्भ , तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट , तसेच सदर परिसर भागातील जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाट सह वादळी वारे , पाऊस व काही ठिकाणी गारपिट होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

दि.31 मार्च रोजी वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे , मात्र काही भागांमध्ये अस्थिर हवामान व वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे . तसेच दिनांक 01 ते 04 एप्रिल या कालावधीमध्ये वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे .

यामुळे शेतकऱ्यांनी पुढील आठवडा पर्यंत रब्बी पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी साठवणूक करण्याचे सुचित करण्यात आले आहेत . तसेच दरम्यानच्या काळात पाळीव प्राण्यांची देखिल काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment