@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Will newly recruited teachers get pension as per the old rules and old pension regulations? ] राज्य सरकारने दिनांक 01.11.2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना रद्द करुन नविन पेन्शन प्रणाली लागु करण्यात आलेली आहे .
शिक्षक पात्रता परीक्षा नियम हा जुना असला तरी , जे शिक्षक नियमानुसार पदभरती झाले आहेत , अशांना देखिल शिक्षक पात्रता परीक्षा देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत . तसे संबंधित विभाग मार्फत परिपत्रक देखिल निर्गमित करण्यात आले आहेत .
दि.01.11.2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागु नाही , तर शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य का ? असा सवाल विचारण्यात येत आहे . जर सरकार एखादा निर्णय कोणत्या कालावधीमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांना लागु करत असेल . तर जुनी पेन्शन देखिल नवनियुक्त शिक्षकांना लागु करण्यात यावी , अशी शिक्षकांकडून मागणी होत आहे .
शिक्षक पात्रता परीक्षाचा निर्णय कितपत योग्य ? : तज्ञांच्या मते अशा प्रकारचे निर्णय घेणे चुकीचे आहे , कारण शिक्षक हा त्याची पात्रता आजमावूनच पदभरती झाला आहे . यामुळे परत त्याची चाचणी घेणे चुकीचे आहे .
कारण शिक्षक पदभरती नंतर परत तो स्पर्धा परीक्षा सारख्या अभ्यासक्रमांपासुन दुर असतो , तो सरकारच्या नियमित पाठ्यक्रमावर आधारित विद्यार्थ्यांना 100 टक्के क्षमतेने शिकविण्याचा प्रयत्न करत असतो . यामुळे अशा प्रकारचे मध्येच शिक्षक पात्रता सारखे निर्णय घेणे चुकीचे असल्याचे तज्ञांचे मत आहे .
- नविन पदभरती शिक्षकांना जुना नियम तर जुनी पेन्शन नियमावलीनुसार पेन्शन देखिल मिळणार का ?
- इ.1 ली ते 12 वी सर्व शिक्षकांना TET पात्रता अनिवार्य असल्याची भुमिका व न्यायालयाचे स्पष्टीकरण – जाणून घ्या सविस्तर .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.17.02.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिती संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक दि.12.02.2026
- घरभाडे भत्ता (HRA) फरक अदा करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.13.02.2026