सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांसाठी गुड न्युज : जानेवारी 2025 पासुन 57% महागाई भत्ता लाभ ..

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ central employee & pensioners good news ] : केंद्र सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे माहे जानेवारी 2025 पासुन परत एकदा डी.ए मध्ये 4 टक्क्यांची वाढ मिळणार आहे .

केंद्र सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांना माहे जुलै 2024 पासुन 53 टक्के दराने डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे . याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना देखिल 53 टक्के दराने डी.ए लाभ फरकासह माहे फेब्रुवारी महिन्यांच्या वेतन देयक / पेन्शन देयकासोबत अदा करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

डी.ए मध्ये परत एकदा वाढ : वर्षातुन 02 वेळा महागाई भत्ता मध्ये वाढ करण्यात येते , यानुसार आता माहे जानेवारी 2025 पासुन डी.ए मधील वाढ प्रलंबित आहे . सदर डी.ए वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांच्या आधारे ठरविण्यात येते .

माहे जुलै ते डिसेंबर महिन्यांच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे सदर जानेवारी महिन्यातील महागाई भत्ता वाढ ठरविण्यात येत असते . माहे डिसेंबर महिन्यांचे निर्देशांक नुकतेच केंद्रीय कामगार विभागांकडून जाहीर करण्यात आले आहेत . यानुसार केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून , डी.ए वाढीचा प्रस्ताव तयार केला जात आहे .

डी.ए मध्ये किती टक्के वाढ होणार ? : जागतिक पातळीवरील घडामोडीमुळे भारतातील अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे . भारतीय शेअर बाजारांमध्ये मागील वर्षापासुन उतरता आलेखच पाहयला मिळत आहे . यामुळे महागाईचे प्रमाण देखिल मोठ्या प्रमाणात वाढत आहे . यामुळे महागाई भत्ता मध्ये 4 टक्के पर्यंत वाढ होवू शकते , असे तज्ञांचे मत आहे .

डी.ए वाढीचा निर्णय कधी ? : दरवर्षी होळी सणाचे औचित्य साधूनच केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये वाढ केली जाते . यानुसार मार्च महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत डी.ए वाढीचा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जाईल .

केंद्र सरकार प्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए लाभ कधी : नेहमीच केंद्र सरकारने डी.ए वाढ लागु केल्यानंतर 03-04 महिन्यानंतर डी.ए वाढीचा लाभ महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात येतो . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी मधील डी.ए वाढीच्या लाभासाठी सप्टेंबर महिन्या पर्यंत वाट पाहावी लागणार आहे .

Leave a Comment