कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक बदली संदर्भात महत्वपुर्ण सुधारित पत्र निर्गमित दि.13.03.2025

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important revised letter regarding public transfer of employees issued on 13.03.2025 ] : कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून , सदर बैठकीमध्ये प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यात येणार आहेत . याबात सचिव ग्रामविकास व पंचायत राज यांच्या कार्यालयाकडून दिनांक 13.03.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .

जिल्हा अंतर्गत बदली बाबत प्रलंबित असणारे प्रश्न : प्रलंबित प्रश्नांमध्ये जिल्हा अंतर्गत बदलीसाठी दि.31 मे ऐवजी 30 जुन या तारखेनुसार , प्रक्रिया राबविण्यावी तसेच शासन निर्णय 2022 मध्ये काही जिल्हा परिषदांनी विलंबाने अवघड शाळा घोषित केल्या होत्या , त्यामुळे 2022 मध्ये घोषित केलेल्या अवघड शाळांमधील शिक्षकांना सन 2025 च्या बदली प्रक्रियेत संधी द्यावी .

तसेच आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची किंवा त्यांच्या आपसी शिक्षकांची पुर्वीच्या जिल्हा परिषदेमधील सेवा ग्राह्य धरुन त्यांची जिल्हा अंतर्गत शिक्षक बदलीसाठी सेवाज्येष्ठता ग्राह्य धरावी ..

हे पण वाचा  :  कर्मचाऱ्यांना थकबाकी व्याजासह, जाणून घ्या सविस्तर परिपत्रक..

  • आंतरजिल्हा बदलीपुर्वी सर्व पदोन्नती प्रक्रिया पुर्ण करावी ( यांमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक , व पदवीधर पदोन्नती )
  • तसेच आंतरजिल्हा बदलीकरीता मागील वर्षाच्या संचमान्यतेनुसार , रिक्त जागा कळवावेत तसेच दिनांक 31.05.2025 पर्यंतची निवृत्तीने सर्व रिक्त होणाऱ्या पदांचा यात समावेश असावा .
  • तसेच आंतरजिल्हा बदलीसाठी मागील वर्षाच्या संचमान्यतेनुसार रिक्त जागा कळवावेत तसेच दि.31.05.2025 पर्यंतची निवृत्तीने सर्व रिक्त होणाऱ्या पदांचा यात समावेश असावा .
  • तसेच आंतरजिल्हा व जिल्हा बदल्यांसाठी आपसी बदली प्रक्रिया राबवावेत असे प्रलंबित प्रश्नावर बैठक आयोजित करण्यात आली आहे .

सदर बैठक दिनांक 17 मार्च 2025 रेाजी दुपारी 4.00 वाजता परिषद सभागृह दालन क्र.05 सातवा मलजा मुख्य इमारत मंत्रालय मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे .

Leave a Comment