@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding state employees: Dearness allowance 55%, retirement age 60 years, brief review of pension system ] : राज्य कर्मचारी संदर्भात वाढीव महागाई भत्ता , निवृत्तीचे वय 60 वर्षे तसेच पेन्शन प्रणाली संदर्भात संक्षिप्त आढावा या लेखामध्ये जाणून घेवूयात .
01.सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे : राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करणेबाबत , कर्मचारी संघटनेकडून वेळोवळी सरकारकडून मागणी करत आहेत . परंतु सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीला काही आमदार तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी संघटनांकडून विरोध केला जात आहे . यामुळे सदर निवृत्तीचे वय वाढीबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे .
02.महागाई भत्ता 55 टक्के : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जानेवारी 2025 पासुन 2 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे . त्याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहे . याबाबत प्रस्ताव वित्त विभाग मार्फत मंजुरी करीता पाठविण्यात आला असल्याचे वृत्त समोर येत आहे .
हे पण वाचा : गट क व ड संवर्गातील 490 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
03.पेन्शन प्रणली : राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना ऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा युनिफाईड पेन्शन योजना या पैकी एकाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे .
परंतु वरील सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व युनिफाईड पेन्शन योजना यांची तुलनात्मक पेन्शन गणना बाबत सविस्तर माहिती अद्याप विशद करण्यात आलेली नाही . तसेच सदर पेन्शन योजनांमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे काही लाभ अंतर्भुत करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहेत .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) …
- राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 55% DA वाढीचा अधिकृत निर्णय (GR) 31 जुलै अखेर !
- 10 , 20 व 30 वर्षे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश !
- चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आयुक्तालयावर धडक मोर्चा ; जाणून घ्या सविस्तर मागण्या !
- राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सा.प्र.विभागाकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.22.07.2025