@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ List of holidays for the academic year 2025-26 announced ] : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील सुट्यांची यादी जाहीर करणेबाबत शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) कार्यालय नाशिक , मार्फत दिनांक 27.06.2025 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .
सदर परिपत्रकानुसार माध्यमिक शाळा संहिता नुसार शासनाने घोषित केलेल्या सार्वजनिक सुट्टया माध्यमिक शाळांना देणे , बंधनकारक आहे . त्यामुळे कोणतीही संस्था / व्यक्ती यांना शासनाने अधिसुचित केलेल्या सुट्टीच्या दिवशी शाळा चालु ठेवून त्याऐवजी अन्य पर्यायी सुट्टी घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत .
| अ.क्र | तपशिल | सुट्टीचे दिवस |
| 01. | मा.विभागीय आयुक्त नाशिक यांनी जाहीर केलेल्या सुट्टया | 03 दिवस |
| 02. | मुख्याध्यापक अधिकारातील सुट्टया | 03 दिवस |
| 03. | सार्वजनिक शासकीय / वैकल्पिक सुट्या | 20 दिवस |
| 04. | दिपावलीची सुट्टी (दि.17.10.2025 ते दि.01.11.2025 ) | 13 दिवस |
| 05. | उन्हाळी सुट्टी (दि.02.05.2026 ते दि.13.06.2026 ) | 37 दिवस |
| एकुण सुट्यांची दिवस | 76 |
हे पण वाचा : आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी अपडेट ; लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित !
नमुद सुचना : एखाद्या शाळेला नाताळ / गणेश उत्सव या सारख्या सणांचे प्रसंगी अगर इतर कालावधीत यादी दर्शविल्यानुसार दिवसांपेक्षा अधिक सुट्या द्यावयाच्या असतील तर त्या सुट्टया दीर्घ सुट्ट्यांच्या कालावधी कमी करुन या कार्यालयाच्या परवानगीने समायोजित करुन घेता येतील , त्याकरीता स्वतंत्ररित्या तारखा ठरवून देण्याचे प्रयोजन नसेल .

आयुक्त यांनी जाहीर केलेल्या स्थानिक सुट्टी : पोळा दि.22.08.2025 , नरक चतुर्दशी – 20.10.2025
या संदर्भातील सविस्तर परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी Click here
- कुटुंबनिवृत्ती वेतन लाभाचे वारसांचा क्रम , निवृत्तीनंतर विवाह केल्यास कुटुंबनिवृत्तीवेतन बाबत सविस्तर माहीती !
- या राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये राज्य सरकारचे केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर .
- राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारे 03 आर्थिक लाभाची गणना ; जाणून घ्या सविस्तर .
- अमेरिका – व्हेनेझुएला वाढत्या तणावामुळे सोने – चांदी दरात पुन्हा उसळी ; जाणून घ्या कारणे !
- निवृत्तीनंतरही सेवेत मुदतवाढ देणेबाबत , महत्वपुर्ण GR ; जाणून घ्या सविस्तर !