@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Pensioners excluded from the Eighth Pay Commission ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत समितीचे गठण करण्यात आले आहे . सदर समितीला कामकाजाची रुपरेषा देखिल देण्यात आलेली आहे .
यानुसार पेन्शन धारकांना आता आठवा वेतनातुन वगळण्यात आले आहेत . यांमध्ये केवळ केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील केंद्रीय कर्मचाऱ्यांचाच विचार करण्यात आला आहे .
पेन्शन धारकांना आठवा वेतन आयोगानुसार सुधारित पेन्शन वाढीवर कोणताही विचार नसणार आहे . ज्यामुळे तब्बल 59 लाख पेन्शन धारकांना आठवा वेतन आयोगापासुन वंचित रहावे लागणार आहेत .
प्रत्येक वेतन आयोगामध्ये पेन्शन धारकांना देखिल समावेश करण्यात येत असते , परंतु यंदाच्या आठवा वेतन आयोगांमध्ये केंद्र सरकारच्या नविन वित्तीय धोरण 2025 जाहीर झाल्याने पेन्शन धारकांना वगळण्यात आले आहे .
निवृत्ती वेतनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण GR संकलित (PDF स्वरुपात) पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
अगोदरच सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ऐवजी राष्ट्रीय पेन्शन योजना (शेअर मार्केट आधारावर) लागु करण्यात आलेली आहे . ज्यांमध्ये जुनी पेन्शन सारखे आर्थिक व सामाजिक लाभ मिळत नाही .
आता नविन वेतन आयोगातुन वगळल्याने पेन्शन धारकांना वाढीव आर्थिक लाभापासुन वंचित रहावे लागणार आहे . यावर पेन्शन धारक संघटना मार्फत नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे .
- कुटुंबनिवृत्ती वेतन लाभाचे वारसांचा क्रम , निवृत्तीनंतर विवाह केल्यास कुटुंबनिवृत्तीवेतन बाबत सविस्तर माहीती !
- या राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये राज्य सरकारचे केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर .
- राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारे 03 आर्थिक लाभाची गणना ; जाणून घ्या सविस्तर .
- अमेरिका – व्हेनेझुएला वाढत्या तणावामुळे सोने – चांदी दरात पुन्हा उसळी ; जाणून घ्या कारणे !
- निवृत्तीनंतरही सेवेत मुदतवाढ देणेबाबत , महत्वपुर्ण GR ; जाणून घ्या सविस्तर !