पगारदारांसाठी तज्ञांचा 50-30-20 चा फॉर्म्युला ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Experts’ 50-30-20 formula for salaried employees ] : नोकर करणाऱ्यांना दरमहा एकदा महिन्याचा मोबदला मिळत असतो . परंतु सदर पगाराचा योग्य प्रकारे नियोजन न केल्याने , पगार हा पुढील पगारापर्यंतच टिकतच नाही .

शेवटी दुसऱ्यांकडून पैसे मागावे लागते किंवा क्रेडीट कार्डचा वापर करावा लागतो . याकरीता अर्थतज्ञांकडून पगारदारांनी पगाराचा वापर कसा करावा यासाठी एक 50-30-20 चा फॉम्युला सांगितला आहे .

50 टक्के पगाराचा वापर : खरे तर पगाराच्या 50 टक्के रक्कम ही भविष्यासाठी सेव्हिंग करणे आवश्यक आहे परंतु आजच्या महागाईच्या काळात 50 टक्के सेव्हिंग होणे शक्य नाही . याशिवाय आनंदायी आयुष्य जगणे हे देखिल महत्वाचे आहे , यामुळे 50 टक्के पगाराचा वापर हा आवश्यक खर्च करीता करावा .

जसे कि वाहन खर्च , आहार खर्च ( शरीरासाठी पोषक ) , घरभाडे , पाणी बील , इतर आवाश्यक बाबीवर खर्च करण्यात यावा . त्यापैकी 5 टक्के रक्कम वैद्यकीय खर्चासाठी राखीव ठेवावी .

30 टक्के पगाराचा वापर : आजच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक जन चिंतेत आयुष्य व्यतित करत आहेत . हे आयुष्य एकदाच असल्याने , पगाराचा 30 टक्के वापर हा मनोरंजन करीता केला पाहिजे . जसे कि , पर्यटन , चित्रपट पाहणे , आपले एखादे छंद जोपासण्यासाठी सदर 30 टक्के रक्कमेचा वापर करावा .

आर्थिक तंगी असल्यास सदर 30 टक्के खर्चाचा वापर कमी करुन सदर निधीचा सुयोग्य वापर करावा .

20 टक्के पगाराचा वापर : पगाराच्या निदान 20 टक्के रक्कमेचा वापर हे भविष्यासाठी केला पाहिजे , ज्यांमध्ये एखादी गुंतवणुक योजना , निवृत्तीवेतन करीता गुंतवणुक करीता गुंतवणुक केली पाहीजे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment