@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Circular dated 03.12.2025 regarding school closure agitation in the state on 05.12.2025 ] : दि.05.12.2025 रोजी राज्यातील शाळा बंदच्या आंदोलाबाबत शिक्षण संचालनालय मार्फत दि.03.12.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
सदर परिपत्रक हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व , शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) जि.प.सर्व तसेच शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांच्याप्रति सादर करण्यात आले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील खाजगी / अनुदानित तसेच अंशत : अनुदानित त्याचबरोबर विना-अनुदानित शाळांमधील शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी हे विविध मागणीकरीता दिनांक 05.12.2025 रोजी शाळा बंद आंदोलनांमध्ये सहभागी होणार आहेत .
तरी सदर दिवशी शाळा बंद राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच दि.05.12.2025 रोजी ज्या शाळा बंद राहतील त्या शाळेतील संबंधित मुख्याध्यापक , शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे 01 दिवसांचे वेतन कपात करण्याची कार्यवाही ..
करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . यामुळे जे शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी उद्याच्या संपामध्ये सहभाग घेणार आहेत , अशांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे .

- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.02.2026
- 58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .
- राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !