@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Calculation of 03 financial benefits to be received by state employees after retirement ] : राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारे 03 आर्थिक लाभाची गणना कशी केली जाते ? या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
निवृत्तीवेतन ( Pension ) : ज्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे , अशा कर्मचाऱ्यांना अर्हकारी सेवेच्या 20 वर्षे सेवा पुर्ण झाल्याच्या नंतर त्यांना शेवटच्या मुळ वेतनाच्या ( शेवटच्या मागील 12 महिन्यांच्या वेतनाच्या सरासरी इतकी ) 50 टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून अदा केली जाते .
सदर 50 टक्के रक्कम ही मुळ पेन्शनची रक्कम असते . त्यावर विद्यमान महागाई भत्ता अदा करण्यात येतो . अशी रक्कम निवृत्तीनंतर पेन्शन चा लाभ दिला जातो . तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना / युनिफाईड पेन्शन योजनांमध्ये देखिल सुधारीत पेन्शन प्रणाली नुसार शेवटच्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम ..
पेन्शन म्हणून ग्राह्य धरले जाईल , परंतू याकरीता कर्मचाऱ्यांची किमान अर्हताकारी 25 वर्षे सेवा पुर्ण होणे आवश्यक असेल , व सदर कर्मचाऱ्यांने मध्येचे राजीनामा दिल्यास , त्यास सदर लाभ ( 50 टक्के पेन्शनचा ) मिळणार नसल्याची तरतुद आहे .शिवाय यावर जुनी पेन्शन प्रमाणे महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय नाही .
अंशराशीकरण : अंशराशीकरणची रक्कम काढण्यासाठी मुळे निवृत्तीवेतन X 40% X 12 X अंशराशीकरणाचा सुधारित तक्तानुसार मुल्य .असे सुत्र वापरुन अंशराशीकरणाचे मुल्य काढू शकता .
सेवानिवृत्ती उपदान : कर्मचाऱ्यांच्या दीर्घ सेवा व त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून सदर रक्कम एकरकमी स्वरुपात दिली जाते , कर्मचाऱ्याच्या मृत्युनंतर नामनिर्देशत वारसांना देखिल लाभ अदा केला जातो . याची मर्यादा सुधारित शासन निर्णयानुसार 20 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे .
- कुटुंबनिवृत्ती वेतन लाभाचे वारसांचा क्रम , निवृत्तीनंतर विवाह केल्यास कुटुंबनिवृत्तीवेतन बाबत सविस्तर माहीती !
- या राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये राज्य सरकारचे केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर .
- राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारे 03 आर्थिक लाभाची गणना ; जाणून घ्या सविस्तर .
- अमेरिका – व्हेनेझुएला वाढत्या तणावामुळे सोने – चांदी दरात पुन्हा उसळी ; जाणून घ्या कारणे !
- निवृत्तीनंतरही सेवेत मुदतवाढ देणेबाबत , महत्वपुर्ण GR ; जाणून घ्या सविस्तर !