राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.17.02.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 04 major important government decisions (GR) were issued on 17.02.2026 regarding state employees. ]: राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.17.02.2026 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आले आहेत .

01.सार्वजनिक बांधकाम विभाग : सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कर्मचाऱ्यांकरीता विभागीय परीक्षा नियमातील तरतुदी लागु करणेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूरी देण्यात आली आहे .

02.विधी व न्याय विभाग : शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्ज घर बांधणी अग्रिम वाटप करीता विधी व न्याय विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे .

03.वेतन आयोगाची थकबाकी : महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपुर येथील 195 कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातुन विशेष बाब म्हणून दिनांक 01.04.2006 ते दि.25.11.2014 या कालावधीमधील सहाव्या वेतन आयोगाची थकबाकीची रक्कम अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

04.कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण : सन 2025-26 मध्ये राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत तांत्रिक प्रशिक्षणासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे या योजना अंतर्गत निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

या संदर्भातील वरील चारही शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी Click Here

WhatsApp Group Join Now

Leave a Comment