कुपोषण निर्मूलना सोबतच आता पूर्व प्राथमिक शिक्षकांचे सर्व धडे शिकवणाऱ्या अंगणवाडीच्या सेविका मदतनीस यासोबतच मिनी अंगणवाडी सेविका या सर्वांना राज्य शासनाच्या माध्यमातून आता दीड हजार रु. रक्कम ही मानधनांमध्ये वाढवली असून ही रक्कम एप्रिल महिन्यापासून सेवकांना प्राप्त होईल. या विषयाचा शासन निर्णय आता महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे.
अंगणवाडी सेविकांना ज्यांच्या त्यांच्या पदानुसार दहा हजार ते दहा हजार पाचशे, या सोबतच पाच हजार पाचशे ते सहा हजार, सात हजार ते साडेसात हजार इतके मानधन प्राप्त होणार आहे हे मानधन वाढीव रकमेतून मिळणार आहे राज्यभरातील जवळपास दोन लाख 7 हजार अंगणवाडी सेविकांना याचा लाभ घेता येईल.
तुटपुंजन मानधनाच्या माध्यमातून काम करत असणारे कर्मचाऱ्यांच्या मानधनांमध्ये आता वाढवावे अशी प्रमुख मागणी सेविकांनी अधिक वर्षापासून केली होती. अशावेळी अनेक वेळा निवेदन देण्यात आले निदर्शने देखील केली मोर्चे सुद्धा काढले परंतु आतापर्यंत शासनाला जाग आली नव्हती.
एक तर तुम्ही शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या किंवा किमान मानधनांमध्ये बदल तरी करावा अशी मागणी अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांनी सतत करण्यावर भर दिला.
अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या आणि प्रशासनाचे कर्मचाऱ्यांनी लक्षच वेधले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या लढ्यामध्ये आता विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा त्यांना साथ देऊन विधानसभेमध्ये आवाज उठवला. तेव्हा सरकार जागी झाली आणि अधिवेशनात याची घोषणा केली.
परंतु हे मानधन नक्की मिळणार तरी कधीपासून असा प्रश्न अनेक कर्मचाऱ्यांचा होता आता शासन निर्णय निर्गमित झाल्यामुळे मानधन मिळणार आहे तर निश्चितच आहे. त्यामुळे अनेकांचा हा प्रश्न मार्गी लागणार आहे.