Business Idea : तुम्हाला स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असेल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. कारण कमी भांडवलामध्ये व्यवसाय उभा करणारे सिस्टीम सध्या आपण तुरळक ठिकाणीच बघतो. परंतु आता अगदी कमी वाढवला तुम्ही स्वतःचा व्यवसाय उभा करून चांगल्या रीतीने चालू शकतात.
आज तुमच्यासाठी एक उत्तम प्रकारचे असेच एक व्यवसाय आयडिया / संधी आम्ही घेऊन आलेलो आहोत , मित्रांनो हा एक असा व्यवसाय आहे ज्या माध्यमातून तुम्ही अगदी 50% पर्यंतचा नफा प्राप्त करू शकता. हो तर आम्ही तुम्हाला आज स्टेशनरीच्या व्यवसायाबद्दल माहिती देत आहोत.
सर्वसाधारणपणे कॉलेज शाळा हायस्कूल इत्यादी शिक्षणाच्या ठिकाणी आजूबाजूस आपल्याला स्टेशनरी पाहायला मिळतील आणि त्या स्टेशनरीच्या दुकानावर गर्दी ही तितकीच असते. कारण शैक्षणिक क्षेत्रात स्टेशनरी वस्तूंना सर्वात जास्त मागणी आहे हा व्यवसाय सुरू करून तुम्ही अगदी मोठी कमाई करू शकता.
आज काल बाजारपेठेमध्ये स्टेशनरीच्या व्यवसायाला मोठी मागणी आहे. या माध्यमातून नागरिकांना चांगल्या रीतीने पैसे कमवायचे मोठी संधी उभी आहे. छोट्या मोठ्या शहरांमध्ये एक ठिकाणी शाळा शिकणाऱ्या मुलांना पुस्तके व इतर साहित्य उपलब्ध करून देण्याकरिता तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात.
स्टेशनरी उत्पादनाची मागणी
खास करून स्टेशनरी मध्ये आपण बघितले असेल की नोट पॅड पेन्सिल पेन ए फॉर आकाराचा कागद वह्या पुस्तके या वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामागे लग्नपत्रिका भेट कार्ड ग्रीटिंग कार्ड इत्यादी वस्तू सुद्धा तुम्ही तुमच्या स्टेशनरीच्या दुकानात ठेवून याचा सुद्धा सेल करून कमाई करू शकता व जास्तीचे पैसे मिळू शकतात.
जर तुमच्या मनामध्ये स्टेशनरीचे दुकान उघडायचा विचार असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला शॉप ॲड एस्टॅब्लिशमेंट त्याच्यामध्ये मधून अधिकृत नोंदणी करावी लागते आणि महत्त्वाचे म्हणजे स्टेशनरी दुकान सुरू करायचे झाले तर 300 ते 400 स्क्वेअर मीटर इतकी जागा आवश्यक असते. या ठिकाणी अगदी कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय उभा करून मोठी कमाई करू शकता. हा व्यवसाय करण्याकरिता कमीत कमी पन्नास हजार रुपये भाग भांडवल लागेल !
कमाई किती असेल?
तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या बजेटनुसार तुम्ही या व्यवसायामध्ये गुंतवणूक करू शकता आणि अधिक नफा मिळवू शकता. विविध शाळा महाविद्यालय विद्यापीठ यांच्या आजूबाजूला चांगली जागा बघून स्टेशनरीचे दुकान सुरू करा तुमच्या दुकानांमध्ये जर तुम्ही ब्रँडेड उत्पादनाची विक्री केली तर त्यामध्ये तुमची 30 ते 40% पर्यंत बजेट होऊ शकते.
मार्केटिंग आवश्यक
व्यवसाय सुरू केला तर सर्वात प्रथम स्टेशनरी दुकानाचे मार्केटिंग करणे गरजेचे आहे. याकरिता तुम्ही तुमच्या दुकानाच्या नावाचे बॅनर छापून पाम्पलेट छापून तुमच्या आजूबाजूला व शाळेच्या ठिकाणी मार्केटिंग करू शकता. याशिवाय विविध कॉलेजमध्ये शाळेमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही तुमच्या दुकानाबद्दल विशेष माहिती देऊ शकता.
तसेच आता अलीकडे सोशल मीडियाची सुद्धा हवा सुरू आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या व्यवसायाचे मार्केटिंग करून जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि तुमचा व्यवसाय वाढवू शकता. यासोबतच होम डिलिव्हरीची सुविधा सुद्धा तुम्ही या व्यवसायातून करू शकता आणि ग्राहकांना चांगली सेवा देऊन ग्राहक वाढवू शकता.
- कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही NPS खाती वर्ग करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.11.2024
- राज्यातील जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुकीच्या तारखा फेब्रुवारी – मार्चमध्ये ; जाणून घ्या अपडेट !
- राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज ; सत्ता स्थापनेत सहभाग न घेण्याचा निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व NPS खाती रक्कम वर्ग करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.11.2024
- राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट ; GR निर्गमित दि.26.11.2024