राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची UPS योजना अथवा राज्याची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागु करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.13.03.2025

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Circular issued on 13.03.2025 regarding implementation of Central Government’s UPS Scheme or State’s Revised National Pension Scheme for State Employees ] : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची एकीकृत निवृत्तीवेतन योजना अथवा राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागु करणेबाबत , शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 13 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .

सदरचे परिपत्रक हे वित्त विभागाच्या दिनांक 20.09.2024 रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आला आहे . सदरचे परिपत्रक हे विभागीय शिक्षण उपसंचालक ( सर्व ) , शिक्षणाधिकारी माध्यमिक ( जि.प सर्व ) , शिक्षण निरीक्षक ( उत्तर / दक्षिण / पश्चिम ) मुंबई व अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक ( माध्यिमक ) सर्व यांच्या प्रति सादर सादर करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , वित्त विभाग व मा.आयुक्त ( शिक्षण ) कार्यालयाने कळविल्याप्रमाणे सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे , सदर शासन GR मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही अपेक्षित असून , त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : : शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती 2025 …

राज्य शासनांच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनांमध्ये सहभागी होण्याकरीता द्यावयाचा एक वेळेचा विकल्प दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख / विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करायचा आहे .

वित्त विभागाच्या वरील नमुद शासन निर्णय लागु असणाऱ्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियमोचित कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आले आहेत . तसेच शासनांने विचारणा केल्यानुसार , शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कार्यवाही करण्याचे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दिनांक 25 मार्च 2025 पुर्वी सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

Leave a Comment