@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Circular regarding filling up of non-teaching staff (Junior Clerk, Librarian, Laboratory Assistant) posts in schools in the state dated 28.05.2025 ] : राज्यातील शाळांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती करणेबाबत , शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) मार्फत दिनांक 28.05.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील मान्यता प्राप्त असणाऱ्या खाजगी शळा तसेच अंशत : / पुर्णत : अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक हे पदे अनुकंपा नियुक्तीसह ..
100% नामनिर्देशनाने भरण्यास शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भाधि शासन निर्णयातील अटी / शर्तींच्या अधिन राहून मान्यता देण्यात आली आहे . मा.शिक्षण आयुक्त यांच्या दिनांक 27.05.2025 रोजीच्या पत्रानुसार , दिलेल्या निर्देशांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सन 2023-24 च्या संचमान्यता निर्गमित करण्यात आलेली आहे .
सन 2024-25 ची ऑनलाईन माध्यमातुन संचमान्यता एनआयसी च्या माध्यमातुन सुरु असून सदर संचमान्यता प्रक्रिया पुर्ण झाल्याच्या नंतर मंजुर होणाऱ्या पदांवर अतिरिक्त झालेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजन नंतरच पुढील पदभरती करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
हे पण वाचा : शिक्षक (प्राथमिक / माध्यमिक / क्रिडा / संगित ) , लिपिक , शिपाई पदांसाठी थेट पदभरती !
सदर कार्यवाही पुर्ण झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने , अगोदरच पदभरती करुन शालार्थ आय.डी प्रदान करण्याचे लाभ न देण्याचे निर्देश आहेत , अन्यथा संबंधितावर प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे .

- राज्यातील शाळांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचारी ( कनिष्ठ लिपिक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक ) पदे भरणेबाबत परिपत्रक दि.28.05.2025
- Old Pension : शासन निर्णयांमध्ये सुधारण करुन जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , मुख्यमत्र्यांना पत्र सादर .
- Post Office Best Scheme | पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना ! 1000/- रुपये ,गुंतवणुकीवर मिळवा तीन लाखांचा परतावा !
- राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीचे प्रसंग – म.नागरी ( वेतन ) नियम ; जाणून घ्या सविस्तर ..
- भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कराची , लाहोर शहरापर्यंत आत घुसले ; तर बलुचिस्तान मध्ये BLA ताबा ..