@marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Revised Government Decision (GR) regarding induction of contractual employees dated 22.01.2026 ] : कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की , आरोग्य विभाग अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या सपोर्ट स्टाफ यांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृतीबंधातील नियमित सपोर्ट स्टाफ या पदावर समायोजनाने नियमित करण्याबाबत शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित करत असताना त्यांना सध्या कंत्राटी तत्वावर मिळणारे मानधन व त्यावर एक वेतन वाढ मिळवून नियमित वेतनश्रेणी मधील पुढील टप्प्यावर निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते . त्या ऐवजी त्यांना मागील महिन्याचे प्राप्त होणारी मानधन एवढ्या नियमित वेतनश्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात यावे , सदर वेतन निश्चितीला संबंधित कार्यालय प्रमुखांनी मंजुरी द्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत .
सेवा समायोजित केलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी नियुक्ती आदेशाच्या दिनांक पासून 30 दिवसात रुजू होणे आवश्यक असेल . अशा प्रकारच्या विहित कालावधीत रुजू न झाल्यास त्यांचे सेवा समाप्त केली जाईल ,असे निर्देश देण्यात आले आहेत.
