मालमत्तेबाबत किंवा वडिलोपार्जित संपत्ती बाबत प्रत्येक कुटुंबामध्ये वादविवाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. कधी भाऊ बहिणींमध्ये भांडण होते तर कधी भावांमध्ये भांडण होते. जोपर्यंत आई-वडील जिवंत आहेत तोपर्यंत वाद होत नाहीत. परंतु त्यांच्या माघारी वादाला फाटे फुटतात. अशी कित्येक प्रकरणे आपण डोळ्यांनी पाहिले आहेतच. अशी परिस्थिती टाळायची असेल तर पालक जिवंत असतानाच मुलांमध्ये मालमत्ता वाटून घ्यावी हा एक सर्वात महत्त्वाचा पर्याय आहे.
कुटुंबप्रमुख जिवंत असताना जर मालमत्तेची विभागणी झाली नसेल तर अशावेळी मृत्यू झाल्यानंतर मला मतेची विभागणी नक्की कशाप्रकारे करावी. याबाबतचा फायदेशीर नियम निर्गमित करण्यात आला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
हिंदू मुस्लिम कास्ट मधील लोकांसाठी मालमत्ता विभागणीचे महत्त्वाचे वेगवेगळे नियम देशभरातील मालमत्तेच्या अधिकारांवरून बघितले तर हिंदू यासोबतच मुस्लिम धर्मासाठी वेगवेगळे नियम लागू करण्यात आले आहेत. हिंदू धर्माकरिता हिंदू उत्तराधिकार कायदा निश्चित केला असून 1956 सालापासून मुलगा आणि मुलगी दोघांनाही वडिलांच्या संपत्तीवर समान हक्क मिळवता येणार आहे. जर एखादा व्यक्ती मृत्युपत्र न बनवता मरण पावत असेल तर तेव्हा त्या व्यक्तीची जी काही संपत्ती असेल ती वारसदाराला किंवा नातेवाईकाला कायदेशीरपणे दिली जाते.
हिंदू उत्तराधिकार हा महत्त्वाचा कायदा नक्की काय आहे;
तर जो कोणी मालक असेल म्हणजेच वडिलोपार्जित व्यक्ती किंवा कुटुंबप्रमुख जर मृत्युपत्र न करता मरण पावला असेल तर अशावेळी ती जी काही मालमत्ता असेल ती वर्ग एक वारसदारांना दिली जाते. जर वर्ग एक मधील व्यक्ती उपलब्ध नसेल तर वर्ग दोन च्या वारसदारांना ही जी काही संपत्ती असेल ती दिली जाते हिंदू कायद्यामध्ये बौद्ध जैन शेख यांचा सुद्धा समावेश केला आहे.
हे पण वाचा : 5 वर्षात होईल 25 लाख रुपये , जाणून घ्या सविस्तर योजना !
वडिलोपार्जित जी काही संपत्ती असेल त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार वडिलांना नाही. अशावेळी मुलगा व मुलीचे दोघांना सुद्धा त्यांच्या संपत्तीवर समान हक्क मिळवता येतो. पूर्वी मुलीला मालमत्तेमध्ये समान हक्क मिळत नव्हता. परंतु 2005 मध्ये जो कायदा निर्गमित करण्यात आला त्या कायद्याच्या अंतर्गत काही बाबी दुरुस्त केल्या गेल्या आणि सूत्राप्रमाणे मुलींना सुद्धा समान हक्क दिला.
दरम्यानच आता एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे, कोणत्याही मालमत्तेचे विभाजन करत असताना दावेदारांनी ही महत्त्वाची बाब सुनिश्चित केली पाहिजे की मालमत्तेवर कोणतेही थकीत कर्ज नसता कामा नये किंवा इतर कोणताही व्यवहार केला नसला पाहिजे. या सोबतच कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेवर वादविवाद किंवा इतर कायदेशीर बाबी असता कामा नये जेणेकरून कुटुंबामध्ये वाद निर्माण होत नाही…