मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन मिळावी या प्रमुख मागणींकरीता दि.14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या कालावधीत बेमुदत संप पुकारला होता . या संपावर तोडगा काढत राज्य सरकारने , कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे सामाजिक तसेच आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात येणारी नविन पेन्शन योजना लागु करण्याचे आश्वासन दिलेले आहेत .
परंतु आता राज्यातील कर्मचारी संघटना जुनी पेन्शन योजनाच लागु करण्यात यावी , जुनी पेन्शन प्रमाणे योजना नको तर जुनीच पेन्शन हवी आहे अशी तीव्र भावना व्यक्त कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत .जर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु केली नाही , अथवा जुनी पेन्शन प्रमाणे सर्व लाभ लागु न केल्यास राज्यातील कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनांकडून देण्यात आलेली आहे .
राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्यं कर्मचाऱ्यांना मिळणारी अत्यल्प पेन्शन तसेच कोणत्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा मिळत नाही शिवाय NPS मधील जमा रक्कम ही शेअर मार्केटच्या आधारवर असल्याने अधिक जोखिमता कर्मचाऱ्यांना पत्करावी लागत आहे . तर ज्याचे शेवटचे मुळ वेतन 50,000/- रुपये आहे अशा कर्मचाऱ्यांना फक्त 3,000/- ते 5,000/- पर्यंचत पेन्शन मिळत असल्याने , NPS योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचे सामाजिक / आर्थिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळत नाही .
राज्य सरकारने गठित केलेल्या समितीकडून सध्या अभ्यास सुरु असून सदर समितीकडून जर जुन महिन्यापर्यंत सकारात्मक / जुनी पेन्शन प्रमाणे सर्व लाभ लागु न केल्यास सरकारी कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर जाण्याची तयारी दर्शविली आहे .
शासकीय कर्मचारी विषयक (Employee Related ) अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये अवश्य सामील व्हा