अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !

Spread the love

Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important Government Decision (GR) issued on 28.02.2026 through the Finance Department regarding extension of temporary posts. 28.02.2026 ] : अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापुर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या पंरतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही .

अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दिनांक 01 मार्च 2026 ते दिनांक 31.08.2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात येत आहेत .तसेच सदर कालावधीमध्ये सर्व प्रशासकीय विभागांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयाच्या आस्थापनेवारील मंजूर ..

पदांचा आढावा घेवून , सुधारित आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे . यानंतर सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याकरीता कालावधी वाढवून देण्यात येणार नाही याची सर्व विभागांनी नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच सदर पदे सेवार्थमध्ये असल्याची खातरजमा विभागाने करणे आवश्यक असेल असे नमुद करण्यात आले आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment