थकीत वेतन अदा करणेबाबत शासन निर्णय निर्गमित दि.10.03.2025

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Government decision regarding payment of arrears of salary issued on 10.03.2025 ] : थकीत वेतन अदा करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 10.03.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

यांमध्ये नमुद करण्यता आले आहेत कि , मा.उच्च न्यायाल मुंबई , खंडपीठ नागपुर येथे दाखल अवमान याचिका क्र.19172/2024 मधील याचिकाकर्त्या 23 विशेष शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासुन ते सेवासमाप्ती पर्यंतच्या ( नोव्हेंबर 2023 ) या कालावधीतील थकीत वेतन अदा करण्यासाठी रुपये 8,96,100/- इतका निधी वितरीत करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे .

तसेच थकीत वेतनाच्या रकमेची अनुज्ञेयता व परिगणना शिक्षक संचालक ( प्राथमिक ) महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधिन राहून निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे .तसेच थकीत वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यात जमा करावी असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास , शिक्षण संचालक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल , त्यानुसार वेतन अदा केल्याच्या नंतर निधी शिल्लक राहील्यास , त्याबाबतचा अहवाल हा शासनास सादर करावा व शिल्लक निधीचा विनियोग करण्यापुर्वी शासनांची पुर्व मान्यता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच वितरीत करण्यात आलेली निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र एक महिन्यांच्या कालावधीत शासनांस सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच सदरचा निधी हा राज्य प्रकल्प संचालक , महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सुपुर्त करण्यात येत आहे , तसेच सदर निधी हा आहरीत करुन वितरीत करण्यासाठी अवर सचिव / कक्ष अधिकारी शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी सह सचिव उप सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोष्ज्ञित करण्यात येत आहे ..

Leave a Comment