@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Government decision regarding sanctioning personal loans (advances) to government employees ] : शासकीय कर्मचारी यांना वैयक्तिक कर्जे ( अग्रिमे ) मंजूर करणेबाबत , विधी व न्याय विभाग मार्फत दिनांक 11 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत की अटी व शर्तींचे पालन करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना वैयक्तिक कर्जे ( अग्रिमे ) मंजूर करण्यात आला आहे .यानुसार अधिकाऱ्यांचा / कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा दिनांक लक्षात घेवून अधिकारी / कर्मचारी यांचे अग्रिमे मंजुरीचे आदेश काढण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच सदर अग्रिमे अर्जदाराने त्याच कारणासाठी वापरल्याच्या प्रमाणपत्राची एक प्रत संबंधित कार्यालयाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करुन घेण्याचे निर्देश देण्यात आले असून वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 03.02.2012 मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर शासन निर्णयातील नमुद अधिकारी / कर्मचाऱ्यांना संगणक खरेदी करीता वैयक्तिक अग्रिम मंजूर करण्यात आले आहेत , यांमध्ये किमान 20,000/- रुपये ते कमाल 80,000/- रुपये इतक्या मर्यादेत सदर अग्रिमे मंजूर करण्यात आलेले आहेत .
अधिकारी / कर्मचारी खरेदी करणार असलेल्या संगणकाची किंमत ही प्रमाणित अग्रिमापेक्षा कमी असल्यास , संगणकाच्या किंमती इतकेच अर्जदारास मंजूर करण्यात यावे व तसे शासनास त्वरील कळविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनास 11 महिन्यांची मुदतवाढ ; नेमक्या अटी / शर्ती काय आहेत – जाणून घ्या दोन्ही GR !
- शासकीय कर्मचारी यांना वैयक्तिक कर्जे ( अग्रिमे ) मंजूर करणेबाबत शासन निर्णय ; GR दि.11.03.2025
- राज्य कर्मचाऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी ; अखेर शासन निर्णय निर्गमित दि.11.03.2025
- थकीत वेतन अदा करणेबाबत शासन निर्णय निर्गमित दि.10.03.2025
- सेवानिवृत्तीवेतन संदर्भात पार पडलेल्या बैठकीतील प्रमुख मुद्दे ; जाणून घ्या सविस्तर परित्रक !