Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding cashing of earned leave issued on 12.11.2025 ] : अर्जित रजा रोखीकरण बाबत आदिवासी विकास विभाग मार्फत दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या सरकारी आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रजा रोखीकरण संदर्भात नागपुर खंडपीठाच्या दिनांक 27.08.2024 रोजीच्या आदेशानुसार अमंलबजावणी करणे आवश्यक असल्याने पुढीलप्रमाणे सुचित करण्यात आले आहेत .
महाराष्ट्र प्र.न्यायाधिकरण नागपुर खंडपीठ यांच्या आदेश दि.27.08.2024 , शासन पत्र दि.31.08.2023 , वित्त विभाग अधिसुचना दि.28.01.2025 व आदिवासी विकास विभाग परिपत्रक दि.24.07.2020 विचारात घेता आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या आश्रमशाळांवरील दीर्घ सुटी विभाग मधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संचित अर्जित रजा रोखीकरण बाबत पुढीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2025 नुसार आ.विकास विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या सरकारी आश्रमशाळांवरील दीर्घ सुटी विभागातील कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण बाबतचे आदिवासी विकास विभाग परिपत्रक क्र.24.07.2020 अधिक्रमित करण्यात येत आहेत .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
तसेच वित्त विभागाच्या दिनांक 31.08.2023 रोजीच्या पत्रानुसार दीर्घ सुटी विभागातील कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नसल्याचे प्रथमच स्पष्ट केल्याने , दिनांक 31.08.2023 अखेर सेवानिवृत्त झालेल्या आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त सरकारी आश्रमशाळांवरील दीर्घ सुटी विभाग मधील कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण ..
अनुज्ञेय करण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच दिनांक 31.08.2023 नंतर सेवानिवृत्त झालेल्या दीर्घ सुटी विभाग मधील कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण देय असणार नसल्याचे नमुद करण्यात आले आहेत .


- राज्यातील विभाजन प्रवर्गाच्या शाळा तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांकरीता शाळा , विद्यानिकेतन शाळांमध्ये शिक्षक पदभरती बाबत GR !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.03.12.2025 रोजी निर्गिमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) !
- उद्या दि.05.12.2025 रोजी शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यास , डिसेंबर महिन्यात वेतन कपातीचे निर्देश ; परिपत्रक !
- पगारदारांसाठी तज्ञांचा 50-30-20 चा फॉर्म्युला ; जाणून घ्या सविस्तर !
- निवृत्तीचे वय वाढ व जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबतचा विचार सरकारमार्फत प्रस्तावित ; जाणून घ्या सविस्तर !