निवृत्तीनंतरही सेवेत मुदतवाढ देणेबाबत , महत्वपुर्ण GR ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

संगिता पवार प्रतिनिधी [ Important GR regarding extension of service even after retirement ] : सेवानिवृत्तीनंतर देखिल सेवेत मुदतवाढ देणेबाबत , सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 08.01.2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार महत्वपुर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , आवश्यक सेवा करीता निवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांचे विषयनिहाय एमपॅनलमेंट करुन पदभरती करण्याचे निर्देश आहेत .

यांमध्ये आस्थापनाविषयक बाबी / सेवाप्रवेश नियम , पायाभूत सुविधा निर्मिती , नागरी सेवा पुरविणे , विशेष गुप्त वार्ता इ . योजनांचे मुल्यमापन . इ. प्रशासकीय कामांचा आवश्यकतेप्रमाणे समावेश करता येते .

तसेच करार पद्धतीने विवक्षित कामाकरीता नेमणूका करताना पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात यावा व विहीत पद्धतीने जाहीरात देवूनअर्ज मागवावेतन व प्राप्त अर्जामधून पात्र उमेदवाराची निवड करुन सुची तयार करण्याचे निर्देश आहेत .

तसेच एमपॅनलमेंट 03 वर्षाच्या कालावधीकरीता व त्याचा वार्षिक आढावा घेण्यात येवून निवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती करण्याचे निर्देश आहेत .सदरची नियुक्ती ही नियमित स्वरुपात न करता विवक्षित कामाकरीता करण्यात यावी असे निर्देश आहे .

याकरीता विशेष अर्हता व संबंधित कामाचा किमान 03 वर्षांचा अनुभव ही पुर्वअट ठेवण्याचे निर्देश आहेत . तसेच नियमित मंजुर असणाऱ्या पदांवरच सदर नियुक्ती करण्यात यावी .सदर नियुक्तीमुळे सदर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती / पदोन्नतीवर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आहेत .

याकरीता मासिक परिश्रमिक कमाल मर्यादा 40,000/- रुपये इतकी असावी असे नमुद आहे . तसेच करार पद्धतीने नियुक्त देण्यात आल्याने सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांस इतर कोणतेही समायोजन सारखे अधिकार राहणार नाही .

याकरीता कमाल वयोमर्यादा ही 70 वर्षे पेक्षा अधिक नसावी असे नमुद आहे . याकरीता अधिकारी / कर्मचारी हा शारीरिक , मानसिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असणे आवश्यक असेल .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय ( GR ) पुढीलप्रमाणे पाहु शकता .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment