“या” राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांच्या डी.ए वाढीसह जानेवारी पासुन डी.ए थकबाकी अदा करण्याचे निर्देश !

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Instructions to pay DA arrears from January along with DA increase of these state employees/pensioners. ] : केद्र सरकाच्या धर्तीवर डी.ए वाढीचा निर्णय घेण्यात येत आहेत . यांमध्ये काही राज्यांनी आपल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये जानेवारी पासुन डी.ए फरकासह वाढ लागु करण्यात आलेली आहे .

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये दिनांक 01.01.2025 पासुन 02 टक्के वाढ लागु करण्यात आलेली आहे . यामुळे केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांचा एकुण महागाई भत्ता हा 53 टक्के वरुन 55 टक्के इतका झालेला आहे . याच धर्तीवर देशातील इतर राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये वाढ लागु करण्यात येत आहे .

या राज्य कर्मचाऱ्यांचा डी.ए वाढवला : हरियाणा राज्य सरकारने नुकतेच सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 02 टक्के वाढ लागु केलेली होती , आता सहाव्या व पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचारी / पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये वाढ लागु करण्यात आलेली आहे .

यांमध्ये सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन / पेन्शन घेणाऱ्यांच्या डी.ए मध्ये 06 टक्के तर पाचव्या वेतन आयोगानुसार 11 टक्के महागाई भत्ता वाढविण्यात आलेला आहे .सदर डी.ए हा दि.01.01.2025 पासुन वाढविण्यात आलेला असल्याने , मागिल पाच महिन्यांची थकबाकी देखिल मिळणार आहे .

हे पण वाचा : पेन्शन धारकांसाठी सामान्य प्रशासन विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR)

या डी.ए वाढीमुळे सहाव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांचा एकुण डी.ए हा 246 टक्के वरुन 252 टक्के इतका झाला आहे , तर पाचव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांचा एकुण डी.ए हा 455 टक्के वरुन 466 टक्के इतका झाला आहे .

महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना कधी मिळणार डी.ए लाभ ? : महाराष्ट राज्यातील आखिल भारतीय सेवा तसेच विधी विभागातील अधिकारी तसेच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 02 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे .

तर राज्यातील सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये वाढ करण्याचा अधिकृत्त निर्णय लवकरच निर्गमित केला जाणार आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment