सेवानिवृत्तीवेतन संदर्भात पार पडलेल्या बैठकीतील प्रमुख मुद्दे ; जाणून घ्या सविस्तर परित्रक !

Spread the love

@marathipepar वंदना पवार प्रतिनिधी [ Key issues discussed in the meeting regarding retirement benefits ] : सेवानिवृत्ती वेतन संदर्भात जिल्हा परिषद अहिल्यानगर सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी संघटना मार्फत दिनांक 04.03.2025 रोजी झालेल्या पेन्शन अदालतीचे इतिवृत्त सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत .

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प अहिल्यानगर यांचे अध्यक्षेखाली दिनांक 04.03.2025 रोजी सकाळी 11.00 वाजता झालेल्या जिल्हा परिषद सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी संघटना जिल्हा शाखा अहिल्यानगर यांचे पेन्शन अदालत आयोजित करण्यात आलेली होती . सदर पेन्शन अदालत मध्ये झालेल्या मुद्देनिहाय करावयाची कार्यवाही यामध्ये नमुद करण्यात आले आहेत .

यांमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आलेली असून , कर्मचारी संघटनेकडून निवृत्तीवेतन दर महिन्याच्या 01 तारखेला मिळणेबाबत , मागणी केली आहे . तसेच पेन्शन अदालत तालुका स्तरावर आयोजित करण्यात यावी , तसेच आश्वासित प्रगती योजनेचे 10/ 20 /30 लाभ मिळणेबाबत मागणी करण्यात आलेली आहे .

तसेच सातवा वेतन आयेागाचा 5 वा हप्ता अदा करण्याची मागणीसह कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक प्रश्नांच्या अनुषंगाने प्रश्न व सविस्तर कार्यवाही बाबत यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत .

या संदर्भातील पेन्शन अदालतीचे सविस्तर इतिवृत्त डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment