सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील सुट्टयांची यादी जाहीर ; परिपत्रक निर्गमित दि.27.06.2025

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ List of holidays for the academic year 2025-26 announced ] : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील सुट्यांची यादी जाहीर करणेबाबत शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) कार्यालय नाशिक , मार्फत दिनांक 27.06.2025 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .

सदर परिपत्रकानुसार माध्यमिक शाळा संहिता नुसार शासनाने घोषित केलेल्या सार्वजनिक सुट्टया माध्यमिक शाळांना देणे , बंधनकारक आहे . त्यामुळे कोणतीही संस्था / व्यक्ती यांना शासनाने अधिसुचित केलेल्या सुट्टीच्या दिवशी शाळा चालु ठेवून त्याऐवजी अन्य पर्यायी सुट्टी घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत .

अ.क्रतपशिलसुट्टीचे दिवस
01.मा.विभागीय आयुक्त नाशिक यांनी जाहीर केलेल्या सुट्टया03 दिवस
02.मुख्याध्यापक अधिकारातील सुट्टया03 दिवस
03.सार्वजनिक शासकीय / वैकल्पिक सुट्या20 दिवस
04.दिपावलीची सुट्टी  (दि.17.10.2025 ते दि.01.11.2025 )13 दिवस
05.उन्हाळी सुट्टी (दि.02.05.2026 ते दि.13.06.2026 )37 दिवस
 एकुण सुट्यांची दिवस76

हे पण वाचा : आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी अपडेट ; लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित !

नमुद सुचना : एखाद्या शाळेला नाताळ / गणेश उत्सव या सारख्या सणांचे प्रसंगी अगर इतर कालावधीत यादी दर्शविल्यानुसार दिवसांपेक्षा अधिक सुट्या द्यावयाच्या असतील तर त्या सुट्टया दीर्घ सुट्ट्यांच्या कालावधी कमी करुन या कार्यालयाच्या परवानगीने समायोजित करुन घेता येतील , त्याकरीता स्वतंत्ररित्या तारखा ठरवून देण्याचे प्रयोजन नसेल .

आयुक्त यांनी जाहीर केलेल्या स्थानिक सुट्टी : पोळा दि.22.08.2025 , नरक चतुर्दशी – 20.10.2025  

या संदर्भातील सविस्तर परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी Click here

WhatsApp Group Join Now

Leave a Comment