Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State employees get 58% increase in salary for February; but arrears are only for 4 months, that too with March salary ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे फेब्रुवारी 2026 च्या वेतनासोबत प्रत्यक्ष डी.ए वाढ लागु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
शासन निर्णयांमध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहेत कि , दि.01.07.2025 पासुन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय असणाऱ्या महागाई भत्ताचा दर हा 55 टक्के वरुन 58 टक्के इतका करण्यात आलेला आहे .
सदर महागाई भत्ता वाढ ही दि.01.02.2026 पासुन प्रत्यक्ष वेतनासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
फक्त 4 महिन्यांची डी.ए थकबाकी : माहे जुलै 2025 ते ऑक्टोंबर 2025 या कालावधीमधील डी.ए थकबाकी ही माहे मार्च 2026 या महिन्याच्या वेतनासोबत रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत , तर उर्वरित कालावधीसाठीची थकबाकी करीता स्वतंत्ररित्या आदेश निर्गमित केले जाणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
सदर शासन निर्णय हा राज्यातील अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देखिल अनुज्ञेय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- 58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .
- राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांना 58% DA वाढीच्या शासन निर्णयातील सविस्तर अटी / शर्ती पाहील्या का ? जाणून घ्या सविस्तर !
- नोकरी करत-करत हे काम करुन प्रतिमहा मिळवू शकता चांगला पैसा !
- दि.22 ते 28 या कालावधीत या जिल्ह्यात बरसणार पाऊस ; जाणून घ्या तोडकर यांचा सविस्तर अंदाज !