आज दिनांक 21 मार्च रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Major events on March 21st ] : आज दिनांक 21 मार्च 2025 रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखामध्ये खालीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

महाराष्ट्र भुषण : महाराष्ट्र भुषण पुरस्काराची सुरुवात ही सन 1995 साली सुरु झाली , आणि पहिला पुरस्कार सन 1996 साली पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ( साहित्य क्षेत्रातील योग ) यांना देण्यात आला होता . तर आता सन 2024 चा महाराष्ट्र भुषण पुरस्कार राम सुतार ( शिल्पकार ) यांना जाहीर करण्यात आला आहे . या पुरस्कारामध्ये 25 लाख रुपये रोख रक्कम व सन्माचिन्ह देण्यात येते .

HSRP : High Security Registration Plate बसविण्यासाठी सरकारकडून नविन गाईडलाईन समोर आली असून , सदर प्लेट बसविण्याकरीता दिनांक 30.06.2025 पर्यंत मुदवाढ देण्यात आलेली आहे .

विदेशामध्ये 49 भारतीयांना फाशीची शिक्षा : UAE मध्ये 25 , सौदी अरेबियामध्ये 11 , कुवेत मध्ये 3 , मलेशिया मध्ये 06 तर अमेरिका , कतार , इंडोनेशिया व येमेनमध्ये प्रत्येकी 01 अशा एकुण 49 भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे .

नागपुर हिंसाचार प्रकरण : नागपुर येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी फहीम खान व सय्यद असीम अली हे प्रथम आरोपी ठरवून पोलिसांकडून त्यांचा तपास सुरु आहे .

24 तासात पावसाची शक्यता : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासामध्ये विदर्भातील वाशिम , वर्धा, नागपुर , गडचिरोली , अमरावती तर मराठवाड्यातील नांदेड , लातुर , परभणी , हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment