@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important update regarding payment of June salary; Circular issued.. ] : कर्मचाऱ्यांचे माहे जुन महिन्यांचे वेतन अदा करणेबाबत शिक्षण संचालनालय मार्फत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , मुख्याध्यापक यांनी डीडीओ – 02 कडे देयके फॉरवर्ड करण्याचा अंतिम दिनांक हा 16 जुन 2025 असा असेल . तर हायस्कूल मुख्याध्यापक / गट शिक्षणाधिकारी यांना हार्ड कॉपी प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती सहाय्यक लेखा अधिकारी यांना सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 17 जुन असा असेल .
तसेच पंचायत समिती स.ले.अ यांनी सदरचे देयके तपासणी करुन हायस्कूल मुख्याध्यापक / गट शिक्षणाधिकारी यांना प्रतिस्वाक्षरीसह परत करण्याचा अंतिम दिनांक हा 20 जुन 2025 असा असेल .
तसेच पंचायत समिती स.ले.अ यांची देयके तपासणी झाल्याच्या नंतर डीडीओ – 02 ने शालार्थ प्रणालीतुन देयके डीडीओ – 03 कडे फॉरवर्ड करण्याचा अंतिम दिनांक हा 20 जुन असा असेल .
तसेच हायस्कूल मुख्याध्यापक / गट शिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी लेखा शाखा शिक्षण विभाग ( प्राथमिक ) येथे सादर करण्याचा अंतिम दिनांक हा दिनांक 23 जुन 2025 असा असणार आहे .
या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभागातील शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन विहीत कालावधीमध्ये होणार आहेत .
- राज्यातील विभाजन प्रवर्गाच्या शाळा तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांकरीता शाळा , विद्यानिकेतन शाळांमध्ये शिक्षक पदभरती बाबत GR !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.03.12.2025 रोजी निर्गिमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) !
- उद्या दि.05.12.2025 रोजी शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यास , डिसेंबर महिन्यात वेतन कपातीचे निर्देश ; परिपत्रक !
- पगारदारांसाठी तज्ञांचा 50-30-20 चा फॉर्म्युला ; जाणून घ्या सविस्तर !
- निवृत्तीचे वय वाढ व जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबतचा विचार सरकारमार्फत प्रस्तावित ; जाणून घ्या सविस्तर !