या दिवशी शाळा , महाविद्यालयांना तसेच सरकारी / निमसरकारी तसेच खाजगी कार्यालयांना सुट्टी जाहीर ; GR दि.30.12.2025

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ On this day, schools, colleges, government/semi-government and private offices will be closed. ] : राज्यातील शाळा , महाविद्यालये तसेच सरकारी / निमसरकारी तसेच खाजगी कार्यालयांना स्थानिक सुट्टी / भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .  याबाबत उद्योग व उर्जा व कामगार व खनिकर्म विभा मार्फत दि.30.12.2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे , याकरीता दि.15 जानेवारी रेाजी होणाऱ्या राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीकरीता सदर मतदारांना 15 जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी किंवा काही तासांची सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

यानुसार राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यामधील सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच सदरची सुट्टी ही सरकारी / निमसरकारी तसेच उद्योग , उर्जा व कामगार विभाग मार्फत येणाऱ्या सर्व आस्थापना यांमध्ये खाजगी कंपनी , दुकाने , कारखाने , हॉटेल , खाद्यगृहे , नाट्यगृहे , व्यापार , औद्योगिक उपक्रम तंत्रज्ञान कंपन्या , शॉपिंग सेंटर , मॉल्स , रिटेलर्स इ. मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना सदर भरपगार सुट्टी मिळणार आहे .

ज्या ठिकाणी पुर्ण दिवसांची सुट्टी देणे शक्य नसेल , अशा ठिकाणी मतदान हक्क बजावण्यासाठी 02-03 तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .वरील सुचनांचे पालन न केल्यास , तक्रार प्राप्तीनंतर संबंधित आस्थापनांच्या विरुद्ध कायदेशिर कारवाई केली जाणार आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment