@marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ rain Update ] : राज्यामध्ये पुढील 24 तासात चार जिल्ह्यांना अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . याकरिता सदर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आलेला आहे .
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात कोकण , पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये पर्जन्यमान सक्रिय असेल , तर मराठवाडा , विदर्भ विभागामध्ये किरकोळ स्वरूपात पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
“या” चार जिल्ह्यांना अती मुसळधार पावसाचा अंदाज : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील नाशिक , पुणे , सातारा , कोल्हापूर या चार जिल्ह्यांना अति मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : गट ब व क संवर्गातील 1097 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
यामुळे या चार जिल्ह्यातील नागरिकांना पुढील 24 तासात सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे . या व्यतिरिक्त कोकणातील समुद्रकिनारी जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
विदर्भ , मराठवाडा विभागामध्ये किरकोळ ठिकाणी पर्जन्यमानाची शक्यता आहे , या भागात पुढील 02 दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .