विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding the implementation of Dairy Development Project Phase – 2 in 19 districts of Vidarbha and Marathwada regions, important GR issued on 07.04.2025 ] : विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 07 एप्रिल 2025 रोजी कृषी व पदुम विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे .

दिनांक 16.09.2024 रोजीच्या शासन निर्णयाानुसार विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये सन 2024-25 ते सन 2026-27 या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा -2 राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . सदर योजनेच्या अंमलबजावणीकरीता प्रकल्प ..

अंमलबजावणी यंत्रणा विहीत करण्यात आली आहे . दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 02 ची अंमलबजावणी गतीमान व सुसुत्रितरित्या व्हावी . याकरीता प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणेत काही बदल करण्याची बाब शासनांच्या विचाराधीन होती . त्यानुसार शासन निर्णय दिनांक 16.09.2024 मध्ये बदल करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे .

अतिरिक्त प्रकल्प संचालक म्हणून सहआयुक्त पशुसंवर्धन / उपायुक्त पशुसंवर्धन ( पुर्णवेळ ) यांची नियुक्ती करण्यात येईल . तर प्रकल्प अंमलबजावणी समितीची तरतुद रद्द करण्यात येत आहे .तसेच प्रकल्प व्यवस्थापन समिती मध्ये , सहआयुक्त पशुसंवर्धन विभाग नागपुर , अमरावती , छ.संभाजीनगर व लातुर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात येत आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment