@marathipepar वैशाली पवार प्रतिनिधी [ Regarding the implementation of Teacher Recruitment Phase-02, Circular issued on 08.04.2025 ] : शिक्षक पदभरती टप्पा – 02 ची कार्यवाही करणेबाबत , शिक्षण आयुक्तालय मार्फत दिनांक 08 एप्रिल 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्यातील सर्वस्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित , अंशत : अनुदानित विना – अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या प्राथमिक , उच्च प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील ..
रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी तसेच शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ता धारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे व शासन तरतुदी / विविध न्यायालये यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत असल्याची बाब नमुद करण्यात आली आहे .
तसेच त्यानुसार पहिल्या टप्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी दिनांक 22.01.2024 पर्यंत पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांच्या जाहीराती घेवून शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात आलेली आहे .त्यामध्ये मुलाखतीशिवाय 15063 व मुलाखतीसह 2771 अशा एकुण 18034 पदांकरीता उमेदवारांची नियुक्ती करीता पोर्टलमार्फत शिफारस झाली आहे .
त्यानंतर पवित्र पोर्टलवर दिनांक 20.01.2025 पासुन दुसऱ्या टप्यातील नव्याने जाहीरातीची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे . पोर्टलवर विविध व्यवस्थापनांची जाहीराती येत आहेत . सन 2024-25 च्या संच मान्यतांची कार्यवाही झाली आहे . तथापि सन 2024-25 च्या संच मान्यतेमध्ये पदे कमी / अधिकक होण्याची शक्यता विचारात घेता काही व्यवस्थापनांकडे पदे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
तसेच संचमान्यतेनुसार , अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करुन केवळ उर्वरित रिक्त पदांच्या जाहीराती पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणे आवश्यक आहे असे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच सन 2024-25 नुसार मंजूर पदे पडताळून पदभरतीकरीता जाहीरातीची कार्यवाही करण्याचे व पोर्टलवर जाहीराती अंतिम करण्याची कार्यवाही दिनांक 15.04.2025 पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025