राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या परिश्रमिक मानधन , अतिकालिक भत्ता , आहार भत्ता , TA / DA मध्ये सुधारणा ; GR निर्गमित दि.24.11.2025

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Revision in the remuneration, overtime allowance, food allowance, TA/DA of state officers/employees ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या परिश्रमिक मानधन , अतिकालिक भत्ता , आहार भत्ता तसेच डीए / टीए मध्ये सुधारणा करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.24 नोव्हेंबर 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यातील आगामी लोकसभा / विधानसभा तसेच सार्वत्रिक / पोट निवडणुक कामकाज करीता नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना देय असणारे परिश्रमिक मानधन निवडणुक / अतिकालिक भत्ता तसेच आहार भत्ता तसेच टी.ए / डी.ए मध्ये सुधारणा करण्यात आली आहे .

निवडणुक भत्ता सुधारित दर :   

अधिकारी / कर्मचाऱ्यांचे पदनामविद्यमान दरसुधारित दर
क्षेत्रिय दंडाधिकारी1500/- एकत्रित एकदा1500/- एकत्रित एकदा
मतदान केंद्राध्यक्ष / मतमोजणी पर्यवेक्षक350/- प्रत्येक दिवसाकरीता / दिवसाच्या भागाकरीता500/- प्रत्येक दिवसाकरीता / दिवसाच्या भागाकरीता अथवा 2000/- एकत्रित एकदा
मतदान अधिकारी250/- प्रत्येक दिवसाकरीता / दिवसाच्या भागाकरीता400/- प्रत्येक दिवसाकरीता / दिवसाच्या भागाकरीता किंवा 1600/- एकत्रित एकदा
मतमोजणी सहाय्यक250/- प्रत्येक दिवसाकरीता / दिवसाच्या भागाकरीता450/- प्रत्येक दिवसाकरीता / दिवसाच्या भागाकरीता किंवा 1350/- एकत्रित एकदा
चतुर्थश्रेणी कर्मचारी200/- प्रत्येक दिवसाकरीता / दिवसाच्या भागाकरीता350- प्रत्येक दिवसाकरीता / दिवसाच्या भागाकरीता 1400/- एकत्रित एकदा
फिरते पथकवर्ग 01 / वर्ग 02 करीता 1200/- एकत्रित एकदा वर्ग -3 करीता 1000/- एकत्रित एकदावर्ग 01 / वर्ग 02 करीता 3000/- एकत्रित एकदा वर्ग -3 करीता 2000/- एकत्रित एकदा
आयकर निरीक्षक1200 एकत्रित एकदा3000/- एकत्रित एकदा
सुक्ष्म निरीक्षक1000/- एकत्रित एकदा2000/- एकत्रित एकदा

आहार भत्ता :        

अधिकारी / कर्मचाऱ्यांचे पदनामविद्यमान दरसुधारित दर
मतदान केंद्र / मतमोजणी केंद्रावर निवडणुक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांच्यासहित पोलिस अधिकारी / कर्मचारी , मोबाईल पथके , होमगार्ड , वनरक्षक दल , ग्रामरक्षक दल , NCC कॅडेटस , माजी सैनिक , स्वयंसेवक150/- प्रत्येक दिवशी किंवा दिवसाच्या भागाकरीता500/- रुपये दिवसाकरीता किंवा दिवसाच्या भागाकरीता

निवृत्ती वेतनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण GR संकलित (PDF स्वरुपात) पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

TA / DA

अधिकारी / कर्मचाऱ्यांचे पदनामविद्यमान दरसुधारित दर
निवडणुक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी / कर्मचारी100% प्रवास भत्ता / दैनिक भत्ता रक्कम ( TA / DA )100% प्रवास भत्ता / दैनिक भत्ता रक्कम

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी Click Here

WhatsApp Group Join Now

Leave a Comment