राज्य कर्मचाऱ्यांचे सन 2025 मधील सार्वत्रिक बदल्याचे वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या परिपत्रक !

Spread the love

@marathipepar वंदना पवार प्रतिनिधी [ Schedule for universal transfer of state employees in 2025 announced; Know the circular.. ] : राज्य कर्मचाऱ्यांचे सन 2025 मधील सार्वत्रिक बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत , या संदर्भात अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक विभाग मार्फत दिनांक 07.03.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

सदर वेळापत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सार्वत्रिक वेळापत्रकाचे विवरणपत्र 01 ते 06 व परिशिष्ट 01 भरुन विहीत मुदतीत वरिष्ठ कार्यालयास सादर करायचे आहेत . परिशिष्ट 01 मध्ये बदली पात्र कर्मचाऱ्यांनी बदली प्राधिकारी कार्यालयास माहिती सादर करावयाचे आहे .

यांमध्ये जे कर्मचारी पसंतीची ठिकाण देतील त्यांचे परिशिष्ट – 01 भरुन सदर कार्यालयात ठेवण्यात यावेत , असे सुचित करण्यात आले आहेत . तसेच बदली अधिनियम 2005 मधील कलम 3 (1) नुसार संबंधित पदावर प्रत्येक कर्मचाऱ्यांचा कार्यरत कालावधी हा दिनांक 31 मे 2025 रोजी पर्यंतचा गणण्यात यावा , तथापि एखाद्या ..

 कर्मचाऱ्यांचा कालावधी कमी किंवा जास्त दर्शविला असल्यास त्यास संबंधित कार्यालय जबाबदार राहील , त्यामुळे अचूक माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच सर्व विवरणपत्रातील कॉलमची माहिती ही अचुक व परिपुर्ण भरण्यात यावी तसेच कार्यरत असणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्यांची माहिती विवरणपत्रात नसल्यास …

हे पण वाचा : 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ; आवेदन करायला विसरु नका !

 व त्या बाबत एखाद्या कर्मचाऱ्यांने आक्षेप नोंदविल्यास त्यास संबंधित कार्यालय जबाबदार राहील असे नमुद करण्यात आले आहेत . सदर माहिती ही Excel Sheet DVOT – Surekh / Sakal Marathi या Font मध्ये तयार करण्यात येवून ई-मेलद्वारे सदर कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

Leave a Comment