News : आजच्या काही प्रमुख चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathipepar पवार प्रतिनिधी [ Some of today’s major current affairs; Know in detail ] : आज रोजी घडलेल्या काही प्रमुख चालु घडामोडींचा आढावा सदर लेखांमध्ये जाणून घेवूयात ..

01.शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम / योजना / संशोधन करीता एआय तंत्रज्ञानावर तब्बल 500 कोटी रुपये खर्च करणार असल्याची राज्याचे मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली .

02.ओबीसींना 42 टक्के आरक्षण : तेलंगणा राज्यात ओबीसी प्रवर्गास 42 टक्के आरक्षण देण्याचे विधेयकास तेलंगणा सरकारने मंजूरी दिल्याने आता ओबीसींना नोकरी , शिक्षण व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 42 टक्के आरक्षण लागू झाले आहे .

03.लाडक्या बहीणींचा मोर्चा : लाडक्या बहीणींना निवडणूकीनंतर 2100/- देण्याचे आश्वासन महायुती कडून करण्यात आले होते , त्याची पुर्तता करण्यात यावी याकरीता लाडक्या बहीणींचा कोल्हापुर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला .

04.शेअर बाजारात मोठी घसरण : मागील 15 दिवसात शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे , यामुळे गुंतवणुकदारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे . आज सेन्सेक्स ने 1131 अंकांनी वाढल्याने गुंतवणुक दारांना आधार मिळाला आहे .

05.अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिकांना प्रोत्साहन भत्ता : लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिकांना प्रति अर्ज 50/- रुपये प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरीता 31.23 कोटी इतकी रक्कम वितरीत करण्यात आला आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment