@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Special reservation for state sportspersons for jobs in government/semi-government and other sectors ] : राज्यातील खेळाडुंना सरकारी / निमसरकारी तसेच इतर क्षेत्रामध्ये नोकरीसाठी विशेष आरक्षणांमध्ये सुधारणा करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.01.07.2025 रोजी महत्वपुर्ण् शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यातील प्राविण्य प्राप्त असणाऱ्या खेळाडूंना सरकारी / निमसरकारी तसेच इतर पात्र क्षेत्रांमध्ये नोकरीकरीता 05 टक्के आरक्षण बाबतचे सुधारित धोरण दिनांक 01.07.2016 रोजीच्या निर्णयानुसार विहीत करण्यात आले आहेत . तसेच दि.10.10.2017 रोजीच्या निर्णयानुसार नमुद परिशिष्ट रद्द करण्यात आले असून त्या ऐवजी सुधारित परिशिष्ट ( क्रिडा विषयक अर्हता ) निश्चित करण्यात आली आहे .
सदर शासन निर्णयानुसार संवर्ग निहाय सुधारित परिशिष्ट निर्गमित करण्यात आलेले आहेत . यांमध्ये नोकरीचा संवर्ग व सदर संवर्ग करीता पात्र क्रिडा स्पर्धा तसेच खेळ विषयक पात्रता ( वैयक्तिक स्पर्धा / सांघिक स्पर्धा ) बाबत आशय नमुद करण्यात आलेला आहे .
अ.क्र | नोकरीचा संवर्ग | क्रिडा स्पर्धा |
01. | गट अ | ऑलिम्पिक , एशियन्स , जागतिक क्रिडा स्पर्धा , एशियन चॅम्पियशीप , कॉनवेल्थ गेम्स , कॉमनवेल्थ चॅम्पियनशीप , युथ ऑलिम्पिक , ग्रॅडमास्टर , पॅरॉलिम्पिक , पॅरा एशियन , वर्ल्ड पॅरॉलिम्पिक , जागतिक आंतरविद्यापीठ , आंरराष्ट्रीय शालेय महासंघ , ग्रँड मास्टर किताब |
गट ब साठी क्रिडा स्पर्धा : ज्युनिअर आंतरराष्ट्रीय कनिष्ठ गटातील – ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीप , युथ कॉमनवेल्थ गेम्स , कनिष्ठ गटातील एशियन चॅम्पियनशीप ,कनिष्ट गटातील कॉमनवेल्थ चॅम्पियनशीप , आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा , राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा ,राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धा , राष्ट्रीय ग्रामीण व महिला क्रिडा स्पर्धा , भारतीय खेळ प्राधिकरणद्वारे आयेाजित स्पर्धा , आ. भारतीय आंतर विद्यापीठ क्रिडा स्पर्धा , आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा .
गट क पदासाठी पात्र क्रिडा स्पर्धा : वरील नमुद करण्यात आलेले गट अ व गट ब पदाकरीता विहीत करण्यात आलेले खेळ प्रकार तसेच राज्यस्तर वरिष्ठ क्रिडा स्पर्धा , राज्यस्तर कनिष्ठ गटातील अजिंक्यपद स्पर्धा, राज्यस्तर शालेय क्रिडा स्पर्धा, राज्यस्तर ग्रामीण व महिला क्रिडा स्पर्धा , भारतीय खेळ प्राधिकरण पुरस्कृत क्रिडा स्पर्धा, राज्यस्तर आंतरविद्यापीठ स्पर्धा, राज्यस्तर आदिवासी क्रिडा स्पर्धा , राज्यस्तर पॅरा ऑलिम्पिक क्रिडा स्पर्धा, राज्यस्तर दिव्यांग क्रिडा स्पर्धा .
गट ड संवर्ग करीता पात्र क्रिडा स्पर्धा : वरील नमुद गट अ , ब , क संवर्ग करीता विहीत करण्यात आलेले क्रिडा स्पर्धा , वरिष्ठ गटातील राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा , पॅरॉऑलिम्पिक राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा वरिष्ठ गटातील सहभाग ..
तसेच राज्यातील प्राविण्यप्राप्त असणाऱ्या खेळाडूंना सरकारी / निमसरकारी व इतर क्षेत्रांमध्ये नोकरीकरीता 5 टक्के आरक्षण करीता यापुर्वी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय व त्यातील तरतुदी तशाच लागु असतील असे नमुद करण्यात आले आहेत .
- राज्यातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती बाबत नविन धोरण ; REA अंतर्गत कामकाज संदर्भात नियमावली !
- पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण / फायदेशीर माहिती ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.02 जुलै रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्यातील खेळाडूंना सरकारी / निमसरकारी तसेच इतर क्षेत्रामध्ये नोकरी करीता विशेष आरक्षणांमध्ये सुधारणा ; GR निर्गमित दि.01.07.2025
- 50/55 व्या वर्षी अथवा 30 वर्षे सेवा झालेल्या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्तीबाबत पुनर्विलोकन ; GR निर्गमित दि.01.07.2025