राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.07.04.2025 रोजी निर्मित झाला अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय !

Spread the love

@marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ A very important government decision was made on 07.04.2025 regarding state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंग विषयक कारवाईच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी घोषित करणे संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 07 एप्रिल 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय  ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार  (GR) शासकीय कर्तव्य पार पाडत असताना , सरकारी कर्मचाऱ्यांकडून अनावधाराने घडलेल्या गैरवर्तणूक अपराध अथवा गैरवर्तनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 नुसार शिस्तभंगाची कार्यवाही केली जाते . अशा प्रकारची शिस्तभंगाची कार्यवाही करताना सक्षम प्राधिकार्‍याने निदेशित करणे आवश्यक असल्याची बाब यामध्ये नमूद करण्यात आली आहे .

सक्षम प्राधिकार्‍याच्या मान्यते शिवाय आदेशित करण्यात आलेली विभागीय चौकशी तसेच देण्यात आलेली शिक्षा विधिग्राह्य ठरते व त्यामुळे अपराधी सिद्धी होवूनही संबंधित उपचाऱ्यास देण्यात आलेली शिक्षेची अंमलबजावणी होत नाही .

शिस्तभंग विषयक कार्यवाहीच्या अनुषंगाने संविधानामध्ये नमूद केलेल्या नियमानुसार बडतर्फ व सेवेतून काढून टाकण्याची शिक्षा देण्याचे अधिकार हे संबंधितांच्या नियुक्ती प्राधिकार्‍यापेक्षा दुय्यम प्राधिकार्‍यास नाहीत अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे , अन्य शिक्षांच्या बाबतीत नियुक्ती अधिकाऱ्यास दुय्यम असणाऱ्या अधिकाऱ्याकडे अधिकार सोपविता येतात असे नमुद करण्यात आले आहेत.

हे पण वाचा : शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , चालक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !

सदर शासन निर्णयांमध्ये नियुक्ती प्राधिकारी किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम अधिकारी लोकसेवा आयोगाची पत्रव्यवहार करताना , अवलंबवयाच्या कार्यपद्धती याबाबत सूचना देण्यात आलेले आहेत . तसेच शिस्तभंग विषयक कार्यवाहीचे प्रकरण हाताळताना या सर्व सूचनांचा विचार करणे आवश्यक असणार आहे . अन्यथा शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याच्या प्रकरणामध्ये त्रुटी राहुन केलेली कार्यवाही ही निष्फळ ठरू शकते , अशी बाब नमूद करण्यात आली आहे .

याकरिता सदर शासन निर्णयांमध्ये शिस्तभंग विषयक प्राधिकारी कोण राहील याबाबतचे आदेश तात्काळ निर्गमित करण्याचे व ते आदेश शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment