@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Starred questions in Parliament regarding UPS Pension Scheme and clarification from the government ] : युनिफाईड पेन्शन योजना बाबत , राज्यसभेत विचारण्यात आलेल्या अतारांकित प्रश्न क्र.1382 ला सरकारकडून स्पष्टीकरणात्मक उत्तर देण्यात आलेले आहेत .
राज्यसभेचे सदस्य जावेद अली खान यांनी सदर अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता , यांमध्ये त्यांनी असा प्रश्न केला कि , अर्थमंत्र्यांना सांगण्यास आनंद होईल का ? दि.24.01.2025 च्या राजपत्र अधिसूचनेनुसार युपीएस पेन्शन योजना अंतर्गत किमान 25 वर्षांच्या पात्र सेवेनंतर स्वेच्छा निवृत्तीच्या बाबतीत …
कर्मचारी ज्या तारखेपासून सेवा चालु ठेवला असेल त्या तारखेपासून खात्रीशीर पेआऊट ( पेन्शन ) सुरु केले जाईल का ? तसे असल्यास त्याचा तपशिल व त्याचे तर्क ? तसेच जुनी पेन्शन योजना व नविन पेन्शन योजनेच्या बाबतीत सेवानिवृत्ती उपदान अंतर्गत स्वीकार्य आहे का ?
तसे असल्यास त्याचा तपशिल व नल्यास त्याची कारणे ? नमुद करावी असाव प्रश्न राज्यसभा सदस्य श्री.जावेद अली यांनी अर्थमंत्र्यांना अतारांकित प्रश्न उपस्थित केला .यावर अर्थ तथा वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी खाालील प्रमाणे स्पष्टीकरणात्मक उत्तर नमुद केले आहे .
वरील प्रश्ना अनुसरु असे उत्तर दिले कि , राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत समाविष्ट असलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत पर्याय म्हणून दिनांक 24.01.2025 च्या अधिसूचनेद्वारे युनिफायइड पेन्षन योजना सुरु करण्यात आली आहे .
हे पण वाचा : आठवा वेतन आयोग व महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी ; जाणून घ्या काही महत्वपुर्ण बाबी !
सदर पेन्शन योजना एक निधी – आधारित प्रणाली असल्याने , कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेआऊटसाठी लागु होण्यासाठी कर्मचारी व नियोक्ता यांचे योगदान नियमित तसेच वेळेवर जमाकरणे तसेच गुंतवणुकीवर अवलंबून आहे .त्यानुसार सेवेच्या वास्तविक कालावधीपेक्ष निधीची वाढ लक्षात घेता स्वेच्छा निवृत्तीच्या बाबतीत खात्रीशीर पेआऊट सुरु करण्याची तारीख अशा कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीच्या तारखेपासून असेल ..
यामुळे जर सेवेचा कालावधी सेवानिवृत्ती पर्यंत चालु राहणे आवश्यक असेल . यामुळे स्वेच्छा निवृत्ती नंतर युपीएस पेन्शन योजना अंतर्गत खात्रीशीर पेन्शन लाभ मिळणार नसलयाचे स्पष्ट होते .
तसेच राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत युपीएस हा पर्याय असल्याने , पेन्शन व पेन्शनर्स कल्याण विभाग द्वारे अधिसूचित केंद्रीय नागरी सेवा नियम 2021 नुसार सेवानिवृत्ती उपदान देय राहील असे नमुद करण्यात आले आहेत .

- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025