@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ GR regarding recruitment of teachers in schools of the division category as well as schools for the children of sugarcane workers, Vidyaniketan schools in the state. ] : पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक / माध्यिमक व उच्च माध्यमिक तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन आश्रमशाळांमधील शिक्षक ..
निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहीत करणेबाबत इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत दि.03.12.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सदर नमुद शाळांमध्ये शिक्षकांची पदभरती ही पवित्र पोर्टलद्वारे करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात येत आहे .
याकरीता सरल या संगणकीय प्रणालीवर नोंदणीकृत विद्यार्थी संख्येच्या आधारे राज्यातील सर्व विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक / ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन …
विजाभज , आश्रमशाळांची संचमान्यता करण्यात येणार आहे .तसेच संचमान्यतेनंतर अतिरिक्त झालेल्या सर्व शिक्षकांचे समायोजन झाल्याच्या नंतर रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे .
नियुक्तीचे माध्यम : शिक्षण सेवक पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार उमेदवाराने ज्या माध्यमांसाठी अर्ज केला असेल , त्या माध्यमासाठीच्याच पदावर नियुक्त देण्यात येणार आहे .
तसेच याकरीता वयोमर्यादा ही किमान 18 वर्षे तर कमाल वय हे 43 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . तसेच शिक्षण सेवक भरती पवित्र प्रणालीद्वारे न करणाऱ्या शैक्षण्किा संस्थांना / शाळांना संबंधित रिक्त पदांचे वेतन / वेतनेतर अनुदान अनुज्ञेय होणार नाही .
अल्पसंख्या संस्था संचलित आश्रमशाळांमधील शिक्षण सेवक भरती व अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेलया शिक्षण सेवक भरतीस पवित्र प्रणालीमार्फत नियुक्ती प्रक्रिया लागु राहणार नाही असे नमुद करण्यात आले आहेत . या संदर्भातील सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी Click here
- राज्यातील विभाजन प्रवर्गाच्या शाळा तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांकरीता शाळा , विद्यानिकेतन शाळांमध्ये शिक्षक पदभरती बाबत GR !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.03.12.2025 रोजी निर्गिमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) !
- उद्या दि.05.12.2025 रोजी शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यास , डिसेंबर महिन्यात वेतन कपातीचे निर्देश ; परिपत्रक !
- पगारदारांसाठी तज्ञांचा 50-30-20 चा फॉर्म्युला ; जाणून घ्या सविस्तर !
- निवृत्तीचे वय वाढ व जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबतचा विचार सरकारमार्फत प्रस्तावित ; जाणून घ्या सविस्तर !