@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ The new scheme will be applicable to central government employees from April 1 ] : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक 01 एप्रिल 2025 पासुन नविन योजना लागु करण्यात येत आहे . सदर नविन योजनातील महत्वपुर्ण बाबी या लेखामध्ये सविस्तर पणे जाणून घेवूयात ..
केंद्र सरकारीने केंद्रीय एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना नविन / सुधारित पेन्शन योजना सुरु केली आहे , सदर पेन्शन योजना ही एनपीएस पेन्शन योजनासाठी पर्यायी पेन्शन योजना असणार आहे . म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना अथवा / नविन सुधारित एकीकृत पेन्शन योजना यापैकी एक पेन्शन योजना करीता विकल्प निवडायचा आहे .
सदर विकल्प सादर करण्याची अंतिम दिनांक ही 31 मार्च अशी आहे , त्यानंतर दिनांक 01 एप्रिल 2025 पासुन नविन एकीकृत पेन्शन योजना लागु होणार आहे . सदर विकल्प सादर करण्याची अंतिम दिनांक ही केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी देखिल असणार आहे .
एकीकृत पेन्शन योजनातील काही महत्वपुर्ण बाबी : जुनी पेन्शन योजना प्रमाणे पेन्शन मिळावी या करीता सदर पेन्शन योजनाची रचना करण्यात आलेली आहे . यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर जुनी पेन्शन प्रमाणे शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम ही पेन्शन रक्कम म्हणून निश्चित केली जाणार आहे .
हे पण वाचा : मार्चचे वेतन देयक अदा करणेबाबत निधीचे वितरण ; GR निर्गमित दि.20.03.2025
सेवा कालावधी : कर्मचाऱ्यांच्या 25 वर्षे सेवा अथवा त्यापेक्षा अधिक सेवा पुर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांस पुर्ण पेन्शनचा लाभ मिळणार आहे . तर ज्यांची सेवा ही 10 ते 25 वर्षे पेक्षा कमी काळाची सेवा असेल त्यांना सेवेच्या कालावधीनुसार पेन्शन निश्चित केली जाईल .
तर ज्यांची सेवा ही 10 वर्षे पेक्षा कमी असेल त्यांना किमान 10,000/- रुपये प्रति महा पेन्शन निश्चित करण्यात येणार आहे .
- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025