Marathipepar प्रणिता प्रतिनिधी [ Maharashtra zp & corporation election in feb / march month ] : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुका बऱ्याच दिवसांपासुन प्रलंबित आहेत , तर आता विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषदा व पालिका प्रशासन निवडणुकांच्या तारखा आयोगाकडून माहे फेब्रुवारी – मार्चमध्ये जाहीर केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .
राज्यातील मागील 2 ते अडीच वर्षांपासुन , जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुका प्रलंबित आहेत . आता विधानभा निवडणुकीनंतर , सदर निवडणुकीची तिढा सुटणार आहे . राज्यातील ओबीसींचे ( OBC ) राजकीय आरक्षणांचा मुद्दा सदर निवडणुकीच्या अनुषंगाने सुटणार आहे .
प्राप्त माहितीनुसार , राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे कार्यक्रम माहे फेब्रुवारी महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यांपासून ते मार्च महिन्यांच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपन्न होणार आहे . तर निकाल मार्च महिन्यांच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका लांबणीवर का पडल्या ? : राज्यातील जिल्हा परिषदा , पालिका प्रशासन तसेच पंचायत समितींच्या निवडणुका ह्या तब्बल 2 वर्षांपासुन लांबणीवर पडल्या आहेत . याचे मुख्य कारण म्हणजे राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण बाबत न्यायालयांमध्ये याचिका दाखल आहे , सदर याचिकेवर लवकरच निर्णय होणार आहे .
राज्यात आरक्षणांच्या मुद्यावर विधीभवनात बऱ्याच चर्चा झाल्याने , सदर निवडणुका लांबवणीवर गेल्या आहेत . सदर ओबीसींचे राजकीय आरक्षणांचा मुद्दा सुटणार असल्याने , जिल्हा परिषदा / पालिका प्रशासनांच्या निवडणुकांचे चाहुल लागले आहेत .
- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025