@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Government decision to increase retirement gratuity limit ] : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु नि उपदानाची कमाल मर्यादा ही 14 लाख रुपये वरुन 20 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे , या संदर्भात शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक 11.03.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक 10 ऑक्टोंबर 2024 नुसार केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील निवृत्तीवेतन धारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांना सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रक्कम ही 14 लाख रुपये वरुन 20 लाख रुपये करणेबाबत ..
शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . तसेच वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा परिषदा , मान्यता प्राप्त खाजगी 100 टक्के अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यिमक व अध्यापक विद्यालयातील 100 टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ..
यांना दिनांक 01.09.2024 पासुन सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा ही 14 लाख रुपये वरुन 20 लाख रुपये अशी वाढविण्यात येत आहे . यांमध्ये वित्त विभाग मार्फत वेळोवेळी देण्यात आलेल्या आदेश त्याचबरोबर सुधारणा लागु राहतील असे निर्देश देण्यात आलेले आहेत .
हे पण वाचा : शिक्षक , ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी पदभरती , सविस्तर जाहिरात पाहा…
या निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषदा , मान्यता प्राप्त खाजगी 100 टक्के अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100 टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मोठा लाभ मिळाला आहे .

- Post Office Best Scheme | पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना ! 1000/- रुपये ,गुंतवणुकीवर मिळवा तीन लाखांचा परतावा !
- राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीचे प्रसंग – म.नागरी ( वेतन ) नियम ; जाणून घ्या सविस्तर ..
- भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कराची , लाहोर शहरापर्यंत आत घुसले ; तर बलुचिस्तान मध्ये BLA ताबा ..
- या दिवशी लागणार इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- कर्मचाऱ्यांचे सेवेचे 18 वर्षे पुर्ण झाल्यानंतर करावे लागणार हे काम ; सरकारचे महत्वपुर्ण निर्देश .