@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Which vehicle needs HSRP / How much does it cost? Until when is the validity period? Find out detailed information.. ] : High Security Registration Plate कोणत्या गाडीला बसविणे आवश्यक आहे ? किती खर्च येतो व मुदत कधीपर्यंत आहे , याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात..
High Security Registration Plate ची वैशिष्ट्ये : या नंबर प्लेटची खास वैशिष्ट्ये म्हणजे अशा नंबर प्लेट वर ॲल्युमिनियम प्लेट असते , व डाव्या कोपऱ्यात अशोक चक्र असणारे होलोग्राम असते , जे स्कॅन केले जावू शकते . तसेच 10 अंकी नंबर असते , ज्यामुळे ओळख पटविण्यास सोयीस्कर जाते . तसेच यावर IND असा कोड नमुद असतो .
कोणत्या गाडीसाठी HSRP बसविणे आवश्यक आहे ? : High Security Registration Plate ही दिनांक 01 एप्रिल 2019 पुर्वी नोंदणीकृत असणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बसविणे आवश्यक आहे . यांमध्ये बाईक , स्कुटर , कार , जीप , ट्रक , बस , ऑटो रिक्षा या वाहनांना High Security Registration Plate बसविणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : अधिकारी , लिपिक , शिपाई , व्यवस्थापक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती ..
HSRP साठी शुल्क : दुचाकी व ट्रॅक्टर साठी 531/- रुपये इतके शुल्क आकारले जातील , तर तीन चाकी वाहनांसाठी 590/- रुपये इतके शुल्क आकारले जाईल . तर पॅसेंजर कार , लाईट मोटर वाहन , मध्यम त्याचबरोबर जड वाहन करिता 879/- रुपये इतके शुल्क आकारले जातील . ( या शुल्का मध्ये 18% GST स्नॅप लॉक शुल्क समाविष्ट असेल .)
HSRP नंबर प्लेट साठी मुदत : HSRP नंबर प्लेट बनविण्यासाठी दिनांक 30 जून 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे .
- राज्यातील विभाजन प्रवर्गाच्या शाळा तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांकरीता शाळा , विद्यानिकेतन शाळांमध्ये शिक्षक पदभरती बाबत GR !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.03.12.2025 रोजी निर्गिमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) !
- उद्या दि.05.12.2025 रोजी शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यास , डिसेंबर महिन्यात वेतन कपातीचे निर्देश ; परिपत्रक !
- पगारदारांसाठी तज्ञांचा 50-30-20 चा फॉर्म्युला ; जाणून घ्या सविस्तर !
- निवृत्तीचे वय वाढ व जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबतचा विचार सरकारमार्फत प्रस्तावित ; जाणून घ्या सविस्तर !