@marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ This work will have to be done after the employees complete 18 years of service; Important instructions from the government. ] : सरकारी नोकरी ही अधिक सुरक्षित मानली जाते , सरकारी नोकरीमध्ये कर्मचाऱ्यांना सेवेत असताना तसेच सेवानिवृत्तीनंतर बरेच सामाजिक व आर्थिक लाभ मिळतात .
सदर सेवेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या सेवाकाळामध्ये आपल्या महत्वपुर्ण नोंदी सतत अपडेट करणे आवश्यक असते . ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पश्चात्य त्याच्या योग्य वारसांना सदर लाभ देता येईल .
केंद्र सरकारच्या कार्मिक व निवृत्तीवेतन कल्याण विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या एका अध्यादेशानुसार , त्याच्या सेवेच्या 18 वर्षे पुर्ण झाल्याच्या नंतर त्याने आपली पडताळणी करुन घेणे अनिवार्य असेल . सदरचे अध्यादेश केंद्र सरकारच्या सर्वच विभागांस दिले गेले आहेत .
कर्मचारी सेवेत रुजु झाल्याच्या नंतर सेवेच्या 18 वर्षे नंतर त्याने आपले सर्व कागदपत्रांची पुन्हा एकदा पडताळणी करुन घेणे आवश्यक असेल . शिवाय नियुक्ती पश्चात सादर करावयाचे सर्व आवश्यक कागदपत्रे जसे कि , चारित्र्य पडताळणी अहवाल , वैद्यकीय अहवाल ( वयोमानानुसार ) , 50/55 वर्षे नंतर सेवा पुढे चालु ठेवणे बाबत आदेश आपल्या सेवेचा तपशिल ..
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
वेतनश्रेणी , वाढीव आर्थिक लाभ , अदा करण्यात आलेले देय भत्ते संबंधित लेखा कार्यालय मार्फत पडताळणी करुन घेणे आवश्यक असल्याचे निर्देश सदर केंद्र सरकाच्या अध्यादेशांमध्ये देण्यात आलेले आहेत .
पडताळणीची आवश्यकता : निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांस पेन्शन प्राप्ती करीता , कर्मचाऱ्यांचे सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते , यांमध्ये त्रुटी असणाऱ्या बाबींची पुर्तता कर्मचाऱ्यांस निवृत्तीपुर्वीच करता यावे , याकरीता कर्मचाऱ्यांना 18 वर्षे सेवा पुर्ण झाल्यानंतर आपल्या सेवापुस्तकाची पडताळणी करुन घेणे आवश्यक आहे .
- राज्यातील विभाजन प्रवर्गाच्या शाळा तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांकरीता शाळा , विद्यानिकेतन शाळांमध्ये शिक्षक पदभरती बाबत GR !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.03.12.2025 रोजी निर्गिमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) !
- उद्या दि.05.12.2025 रोजी शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यास , डिसेंबर महिन्यात वेतन कपातीचे निर्देश ; परिपत्रक !
- पगारदारांसाठी तज्ञांचा 50-30-20 चा फॉर्म्युला ; जाणून घ्या सविस्तर !
- निवृत्तीचे वय वाढ व जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबतचा विचार सरकारमार्फत प्रस्तावित ; जाणून घ्या सविस्तर !