@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Heavy rain alert issued for these 20 districts of the state for the next 36 hours ] : सध्या राज्यामध्ये पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे . पुढील 36 तासांमध्ये राज्यातील 20 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
सध्यास्थितीमध्ये राज्यातील काही भागातुन पावसाचे प्रमाण कमी झाले आहे , मात्र काही भागात पावसाची जोरदार आगमण होताना दिसून येत आहेत . राज्यातील कोकण विभागातील रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याने अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
त्याचबरोबर विदर्भ विभागामधील सर्वच 11 जिल्ह्यांना पुढील 36 तासांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . तर मुंबई उपनगर व मुंबई शहर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यांमध्ये मुंबईला पावसाचा जोरदार अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
हे पण वाचा : स्थायित्व प्रमाणपत्र देणे बाबत सुधारित शासन निर्णय ; GR दि.11.06.2025
याशिवाय राज्यातील ठाणे , पालघर व सिंधुदुर्ग , रायगड , रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तसेच पुणे , नाशिक , सातारा , कोल्हापुरच्या घाट माथा परिसरात जोरदार पावसाचा अलर्ट जारी करण्या आलेला आहे .
मराठवाडा : मराठवाड्यात छ.संभाजीनगर , हिंगोली , नांदेड , परभणी , जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट असून , लातूर , धाराशिव व बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त व्यक्त करण्यात आलेला आहे .
- राज्यातील विभाजन प्रवर्गाच्या शाळा तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांकरीता शाळा , विद्यानिकेतन शाळांमध्ये शिक्षक पदभरती बाबत GR !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.03.12.2025 रोजी निर्गिमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) !
- उद्या दि.05.12.2025 रोजी शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यास , डिसेंबर महिन्यात वेतन कपातीचे निर्देश ; परिपत्रक !
- पगारदारांसाठी तज्ञांचा 50-30-20 चा फॉर्म्युला ; जाणून घ्या सविस्तर !
- निवृत्तीचे वय वाढ व जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबतचा विचार सरकारमार्फत प्रस्तावित ; जाणून घ्या सविस्तर !